संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

राज्यात गोमांस विक्रीला बंदी असतांनाही गोमांसाची वाहतूक होत असल्याचे लक्षात आल्याने तालुका पोलिसांनी एका वाहनाला पकडुन तब्बल 4 हजार किलो गोमांस पकडले.

तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्याज़वळ काल पहाटे 3 वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.

संगमनेर शहरात बेकायदेशीर कत्तलखाने सुरुच असल्याचे यातून समोर आले आहे. शहरातील कत्तलखान्यातून तयार झालेले मांस आयशर टेम्पोतून वाहतूक केले जात असल्याची माहिती तालुका पोलिसांना समजली. काल पहाटे पाठलाग करुन हा टेेम्पो हिवरगाव पावसा जवळील टोलनाक्याजवळ पकडला. या टेम्पोमध्ये 4 लाख रुपये किंमतीचे सुमारे 4 हजार किलो गोमांस असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी टेम्पोचालक नाथा रसाळ यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून टेम्पो व मांस जप्त केले.

याबाबत पोलीस नाईक यमना जाधव यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन नाथा मनोहर रसाळ (वय 42, रा. कुर्ला मुंबई) याच्या विरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर 1543/2020 नुसार भारतीय दंड संहिता 269, 429 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे सुधारीत 2005 चे कलम 5 (क), 9 (अ) प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल एस. एस. पाटोळे हे करत आहे.