संगमनेरात तीन लाखाचे पंधराशे किलो गोमांस जप्त

कत्तलखाना चालक फरार, गुन्हा दाखल
संगमनेरात तीन लाखाचे पंधराशे किलो गोमांस जप्त
Crime

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

राज्यात गोहत्या बंदीला विरोध असतानाही संगमनेर शहरात मात्र बेकायदेशीर कत्तलखाने सुरूच असल्याचे काल पुन्हा स्पष्ट झाले.

गोवंश जातीच्या जनावरांचे कत्तल केलेले मांस विक्री करत असताना आढळल्याने पोलिसांनी कत्तलखाना परिसरातून तीन लाख रुपये किमतीचे पंधराशे किलो गोमांस जप्त केल्याची घटना मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास शहरातील जमजम कॉलनी परिसरातील कुरेशी वाडा येथे घडली.

शहरातील जमजम कॉलनी येथे एका कत्तलखान्या मध्ये गोमांस विक्री होत असल्याची माहिती शहर पोलिसांना समजली. पोलिसांनी रात्री या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता जाहीर अन्वर कुरेशी राहणार भारत नगर हा गोवंश जातीच्या जनावरांचे कत्तल केलेले मास विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना आढळून आला पोलिसांनी कारवाई सुरू करताच पोलिसांची त्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पलायन केले. पोलिसांनी पकडलेल्या मांंसाचा पंचनामा केला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सोनवणे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी जाहीर कुरेशी याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 212/2021 भा.द.वि कलम 269/429 म.प्रा.स.का.क 5(क)9(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पोलीस नाईक लबडे हे करत आहे. जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या आदेशानुसार संगमनेर पोलिसांनी दोन दिवसांपासून शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्या विरुद्ध कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी शेकडो वेळा कारवाई करूनही शहरातील बेकायदेशीर कत्तलखाने सुरू राहतातच कसे असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जाऊ लागला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com