संगमनेर : अंगावर पेट्रोल टाकत आत्महत्येचा प्रयत्न

नवरा-बायकोचे भांडण प्रकरण
संगमनेर : अंगावर पेट्रोल टाकत आत्महत्येचा प्रयत्न

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

नवरा-बायकोचे आपसात भांडण होत असल्याने मुलगी आपल्या ताब्यात द्यावी, या मागणीसाठी गणेश चंद्रभान गायकवाड (रा. खांडगाव, ता. संगमनेर) याने संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना काल बुधवारी सकाळी 11.30 वाजता घडली.

गणेश चंद्रभान गायकवाड (वय 31) याचे व त्याच्या बायकोचे आपसात भांडण होत होते. मुलगी कुणाकडे ठेवायची यावरुन हे भांडण होते. याबाबत सदर महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन सदर महिलेचा नवरा गणेश गायकवाड यास त्याची मुलगी आईकडे ठेवायची की वडीलांकडे ठेवायची हे समजावून सांगत असताना गणेेश गायकवाड याने पोलीस ठाण्याच्या आवारात जात अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल बी. वाय. टोपले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गणेश गायकवाड याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 253/2021 भारतीय दंड संहिता 309 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक खाडे करत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com