सांगवीभुसारमध्ये वाळूतस्करांवर कारवाई

तीन आरोपींसह 8 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त
सांगवीभुसारमध्ये वाळूतस्करांवर कारवाई
file photo

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव (KOpargav) तालुक्यातील सांगवी भुसार (Sangwi Bhusar) स्मशानभूमीजवळ गोदावरी नदीतून(Godavari Reiver)अवैधरित्या तीन ट्रॅक्टर वाळूउपसा (Three tractors illegally extract sand) करताना आढळून आल्याने कोपरगाव तालुका पोलिसांनी कारवाई (Kopargav Police Action) करून तीन ट्रॅक्टर ट्रॉलीसह 08 लाख 90 हजारांचा ऐवज जप्त (Seized) करून त्याच गावातील तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a crime) केला आहे.

तालुक्यातील सांगवी भुसार येथे अवैधरित्या वाळू वाहतूक (Illegal sand transportation) चालू असल्याची माहिती कोपरगाव तालुका पोलीस अधिकार्‍यांना (Kopargav Police) गुप्त खबर्‍या मार्फत मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली असता आरोपी नयन दिलीप गायकवाड, संजय चांगदेव कासार, सचिन मंडलिक थोरात आदी तिघांनी संगनमताने सांगवी भुसार गावचे जवळील स्मशान भूमीजवळ गोदावरी नदीपात्रातील (Godavari River) दोन ब्रास शासकीय वाळू (Government Sand) विनापरवाना बेकायदेशीरपणे एक हिरव्या रंगाचा 03 लाख 50 हजार किमतीच्या जॉन डियर ट्रॅक्टर आरोपी नयन दिलीप गायकवाड याचे मालकीचा व दोन चाकी ट्रेलरमध्ये 02 लाख किमतीचा सिलव्हर रंगाचा आयशर ट्रॅक्टर आरोपी सचिन मंडलिक थोरात याचे मालकीचा त्यास लाल रंगाची ट्रॉली, एक विनाक्रमांकाचा 03 लाख 20 हजार किमतीचा महिंद्रा 575 ट्रॅक्टर , त्यास लाल रंगाची दोन चाकी ट्रेलर संजय चांगदेव कासार याचे ताब्यातील त्यात एक ब्रास वाळू (Sand) अशा विविध तीन ट्रॅक्टरमध्ये (tractors) भरली व चोरी करताना आढळून आले. त्यांची एकूण किंमत 8 लाख 90 हजार इतकी असून हा सर्व ऐवज आरोपींसह जप्त केला आहे.

याप्रकरणी अंबादास रामनाथ वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भा.दं.वि.कायदा कलम 379, 511,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव (PI Daulatrao Jadhav) यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. प्रदीप काशीद करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com