संगमनेर : रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी गाडे, सचिवपदी मोंढे

आज पदग्रहण सोहळा
 संगमनेर : रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी गाडे, सचिवपदी मोंढे

संगमनेर (प्रतिनिधी) / sangamner - रोटरी क्लब संगमनेरची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून क्लबच्या अध्यक्षपदी प्रथितयश बांधकाम व्यावसायिक योगेश गाडे यांची तर सचिवपदी ऋषिकेश मोंढे यांची निवड करण्यात आल्याची माहिती मावळते अध्यक्ष पवनकुमार वर्मा यांनी दिली आहे.

जगभरातून पोलिओ हद्दपार करणार्‍या रोटरी इंटरनॅशनल या सामाजिक संस्थेच्या संगमनेर रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा आज मंगळवार दि. 27 जुलै रोजी मालपाणी हेल्थ क्लब येथे सायंकाळी 6 वा. आयोजित करण्यात आला आहे.

याप्रसंगी आ. डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, माजी प्रांतपाल प्रमोद पारीख, सहायक प्रांतपाल दिलीप मालपाणी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

रोटरी क्लबची कार्यकारिणी पुढील प्रमाणे:-अध्यक्ष योगेश गाडे, सचिव ऋषिकेश मोंढे, उपाध्यक्ष महेश वाकचौरे, क्लब प्रशिक्षक संजय राठी, खजिनदार मयूर मेहता, सहसचिव संजय कर्पे, माजी अध्यक्ष पवनकुमार वर्मा, पब्लिक इमेज सुनील कडलग, आनंद हासे, क्लब प्रशासन दीपक मणियार, सर्विस प्रोजेक्ट ग्लोबल अजित काकडे, सदस्यता मधुसूदन करवा, रोटरी इंटरनॅशनल एम्फसिस डॉ. सुजय कानवडे, डिस्ट्रिक्ट एम्फसिस दिलीप मालपाणी, सार्जेन्ट ऍट आर्म्स विश्‍वनाथ मालानी, सर्व्हिस प्रकल्प डॉ. विकास करंजेकर, पर्यावरण रविंद्र पवार, दि रोटरी फौंडेशन रमेश दिवटे, साक्षरता नरेंद्र चांडक, युथ सर्विस रविकांत ढेरंगे, व्होकेशनल सर्व्हिस सुनील घुले, मानव संसाधन डॉ. सागर गोपाळे, विन्स डॉ. प्रमोद राजुस्कर, क्लब रोटरी व्हिलेज सर्व्हिस सुदीप वाकळे.

रोटरी साक्षरता मिशन अंतर्गत आनंदी शाळा, कोविड 19 च्या पार्श्‍वभूमीवर शाळांमध्ये हँड-वॉश स्टेशन, टॉयलेट प्रकल्प, स्वच्छता अभियान, पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश गाडे यांनी व्यक्त केला आहे. नतून पदाधिकार्‍यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com