संगमनेरच्या पठार भागात जोरदार गारपीट

संगमनेरच्या पठार भागात जोरदार गारपीट

घारगाव |वार्ताहर| Ghargav

गेल्या दोन दिवसांपासून संगमनेर (Sangamner) तालुक्यातील पठारभागात विजेच्या कडकडाट अवकाळी पाऊस पडत आहे. शनिवारीही अनेक भागात दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच पठारभागातील डोळासणे, कर्जुले, पिंपळगाव देपा, सारोळे पठार गावांना गारपिटीने चांगलेच झोडपून काढले. रस्त्यावर, शेतात, घराच्या छतावर गारांचा खच पडला होता. बोराच्या आकाराच्या गाराने (Hail) परिसर पांढराशुभ्र झाला होता. तालुक्यात मागच्या आठदिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. पावसाने रब्बी पिकाचं (Rabbi Crop) मोठं नुकसान केलं असल्याची चित्र दिसत आहे.

संगमनेरच्या पठार भागात जोरदार गारपीट
दुधाच्या टँकरला दोन मोटार सायकलची धडक, 3 ठार एक गंभीर

या अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) व गारपिटीने (Hail) शेतातील फळबाग उध्वस्त झाल्यात तसेच गहू, हरभरा, भाजीपाला, प्रचंड नुकसान झाले. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. शनिवारी दुपारीनंतर अचानक झालेल्या गारपीट (Hail) व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली असल्याचं चित्र पठारभागातील अनेक भागात पाहायला मिळत आहे. डोळासणे, कर्जुले, पिंपळगाव देपा, सारोळे पठार, वरुडी पठार, गुंजाळवाडी गावांमध्ये शेकडो एकर शेतमालासह डाळिंबाच्या (Pomegranate) बगीचा गारपीटीमुळे उद्धवस्त झाला आहे.

संगमनेरच्या पठार भागात जोरदार गारपीट
डॉ. अजित नवले यांच्या नावाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोध ?

त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सगळे लक्ष सरकारी मदतीकडे लागले आहे. राज्यात आणखी काही दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर गरज असेल तर घराबाहेर पडा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. मागच्या काही दिवसात वीजेच्या अनेक घटना घडल्या आहेत.

संगमनेरच्या पठार भागात जोरदार गारपीट
गावकरी झाले गुरूजी; या गावात संपकाळात शाळा सुरू
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com