
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
किरकोळ कारणावरून दोन गटात मध्यरात्री जोरदार राडा (Two Group Fight) झाल्याची घटना शहरातील जुन्या पोस्ट कार्यालयासमोर घडली. परप्रांतीयांच्या दादागिरीमुळे हा प्रकार घडला असून या घटनेत एक जण जखमी (Injured) झाला आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले (PI Rajendra Bhosale) यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पुढील अनर्थ टळला. याबाबत परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्या असून पोलिसांनी दोन्ही बाजू कडील 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे. या घटनेमुळे संगमनेर (Sangamner) शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संगमनेर (Sangamner) शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून परप्रांतीयांची दादागिरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. किरकोळ कारणावरून परप्रांतातील काहीजण स्थानिक नागरिकांना त्रास देत आहेत. शहरातील मेनरोड, अशोक चौक परिसरात अनेक छोट्या कारणावरून वाद (Dispute) होत असतात. काल दि. 28 रोजी अशोक चौक येथे दुपारी 4 वाजेच्या सुमारास निखिल मुर्तडक व अशपाक खान या दोघांमध्ये बॅग विकण्यावरुन भांडण झाले होते. त्यानंतर त्यांच्यामध्ये समझोता झाला होता. रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान महेश नागरी पतसंस्थेच्या समोर उमेर मेहबूब पारवे व त्याचे मित्र शहबाज पठाण, उजेर बागवान असे गप्पा मारत बसले होते.
त्या दरम्यान त्या ठिकाणी निखिल मुर्तडक, श्याम अरगडे, नयन मुर्तडक, सुनिल धात्रक, व सागर (पूर्ण नाव माहीत नाही) व इतर 5 ते 6 जण हातात लोखंडी गज, चाकु, लाकडी दांडे घेवुन त्या ठिकाणी आले.त्यांनी उमेर यास दुपारचे भांडणाचा राग मनात धरुन शिविगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) केली. त्यावेळी त्या ठिकाणी उमेर यांचे चुलत भाऊ सुफियान शेख व सोहेल शेख त्या ठिकाणी आले व ते उमेरला घेवुन तक्रार देण्यासाठी संगमनेर शहर पोलीस स्टेशनला (Sangamner Police Station) निघाले.
उमेर व त्याचे भाऊ पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी येत असताना त्यावेळी रस्त्यातच बाप्ते किराणा दुकानाजवळ उमेर यास तु आमचे विरुध्द तक्रार देण्यास चालला आहे का. असे म्हणुन एकाने चॉपरने उमेर याच्या डाव्या बाजुला पाठीवर वार करुन गंभीर जखमी (Injured) केले. त्यानंतर लगेच सलीम इनामदार यांनी त्याला उपचार कामी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.
याबाबत महेबुब इब्राहीम पारवे (रा. मोठी मज्जीद मागे, मोमीनपुरा) याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी सहा जणांविरुद्ध भादवि कलम 143, 148, 149, 326, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी फिर्याद सिंधू सुनील धात्रक या महिलेने दिली. या फिर्यादीमध्ये तिने म्हटले आहे की, आमचे अशोक चौकात लेडीज पर्स चे दुकान आहे. दुकाना शेजारी आफाक खान यांचे पण लेडीज पर्स चे दुकान आहे. काल दि. 28 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास माझा भाचा निखील मुर्तडक व आमचे गल्लीतच राहणारे आफाक खान यांचे बरोबर पर्स विक्रीच्या भावा वरुन किरकोळ वाद झाले होते. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अत्तार पारवे, आश्पाक खान, मुसाहीत मासुफ खान, उमर मेहबुब पारवे, आफीज खान, चॅटी पुर्ण नाव माहीत नाही, आफाक खान व इतर चार ते पाच इसम असे दुपारी झालेल्या भांडणाचे कारणावरुन आमचे घरात घुसुन तुम्ही आमचे भांडणात का पडल्या असे म्हणुन मला माझे पती सुनिल केशव धात्रक, भाचा निखील मुर्तडक यांना लाथाबुक्यांनी मारहाण (Beating) केली.
त्यावेळी माझे नातेवाईक सोनाली शाम अरगडे व त्यांचे पती शाम आबासाहेब अरगडे, नणंद कमल राजेंद्र मुर्तडक हे शेजारीच राहण्यास असल्याने ते सोडविणेस आले असता वरील लोकांनी त्यांना पण लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करुन तुम्ही येथे धंदा कसे करता तेच पाहतो, असा दम दिला. धात्रक यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक आक्रमक
या दोन गटात काल रात्रभर वाद सुरू होता. रात्री दीड वाजेच्या सुमारास जुन्या पोस्टासमोर मोठा जमाव जमा झाला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले सहकार्यांसह त्वरीत घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आपले वाहन गर्दीत उभे करून आक्रमक होत जमाव पिटाळून लावला. पोलीस निरीक्षकांचे आक्रमक रूप पाहून जमाव निघून गेला यामुळे पुढील अनर्थ टळला.