संगमनेर : सदस्यपदासाठी 666 तर सरपंचपदासाठी 93 उमेदवार रिंगणात

संगमनेर : सदस्यपदासाठी 666 तर सरपंचपदासाठी 93 उमेदवार रिंगणात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत 37 ग्रामपंचायतींसाठी सदस्य पदासाठी दाखल झालेल्या 1311 उमेदवारी अर्जांपैकी माघारीच्या शेवटच्या दिवशी 666 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर सरपंचपदासाठी दाखल झालेल्या 243 अर्जांपैकी 93 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीच्या एकूण प्रभाग 133 साठी 367 सदस्य संख्या आहे. त्यासाठी पुरुष मतदार 51 हजार 772 तर महिला मतदार 47 हजार 614 असे एकूण 99 हजार 386 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. काल दि. 7 डिसेंबर रोजी अर्ज माघारी होती. दाखल उमेदवारांपैकी 542 उमेदवारांनी सदस्य पदासाठी माघार घेतली असून सरपंचपदासाठी 140 उमेदवारांनी माघार घेतली आहे. निवडणूक लढविणार्‍यांमध्ये सदस्य 666 तर सरपंचपदासाठी 93 उमेदवार रिंगणात आहेत.

37 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. त्यात सरपंचपदासाठी 247 तर सदस्यपदासाठी 1311 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी बहुतांशी उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद झाले. त्यानंतर अर्ज माघारीसाठी गाव पातळीवरील नेत्यांनी अर्ज भरलेल्या उमेदवारांची मनधरणी करत त्यांना अर्ज माघारी घेण्यासाठी विनवणी केली. त्यानंतर काल अर्ज माघारीमध्ये बहुतांशी उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले.

तहसील कार्यालयाच्या आवारात उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी ग्रामपंचायतच्या उमेदवारांचे व त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ज्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा आहे. त्यांनाच पोलीस तहसील कार्यालयाच्या आवारात सोडत होते. उमेदवारांच्या इतर कार्यकर्त्यांना व समर्थकांना सोडत नव्हते. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या. तहसील कार्यालयाच्या आवारात उमेदवारी अर्ज मागे घेताना कुठल्याही प्रकारची गडबड गोंधळ करू नये म्हणून शहर पोलीस ठाण्यातील पोलीस सर्व बारीक-सारीक गोष्टींवरती लक्ष ठेवून होते.

निवडणूक रिंगणात असलेले ग्रामपंचायत निहाय सदस्य व सरपंच उमेदवार संख्यानिहायः- साकूर (34, 2), खराडी (4, 3), वाघापूर (2, 3), चिंचोलीगुरव (30, 4), जांभुळवाडी (19, 3), रणखंबावाडी (11, 3), दरेवाडी (12, 2), जांभुत बुद्रूक (18, 3), कर्जुलेपठार (12,4), डोळासणे (10, 0), पिंपरणे (19,3), कोल्हेवाडी (34,3), कोळवाडे (0,2), मालुंजे (19,2) अंभोरे (23, 2), निंबाळे (0.4), जोर्वे (28,3), वडझरी बुद्रूक (15, 2), वडझरी खुर्द (8,2), निमोण (24, 2), तळेगाव दिघे (32, 3), हंगेवाडी (14, 4), कनकापूर (14,2), करुले (5,4), निळवंडे (7,2) पोखरी हवेली (23,2), सादतपूर (14, 3), रहिमपूर (13,2), उंबरीबाळापूर (29,3), निमगावाजाळी (26,2), ओझर खुर्द (28,2), धांदरफळ खुर्द (27,2), निमगावभोजापूर (18,2), चिकणी (27,3), सायखिंडी (10,0), घुलेवाडी (45,5).

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com