ना. थोरात यांच्या संगमनेर तालुक्यात 23 सोसायटींच्या निवडणुका बिनविरोध

ना. थोरात यांच्या संगमनेर तालुक्यात 23 सोसायटींच्या निवडणुका बिनविरोध

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

सहकाराचा जिल्हा म्हणून ओळख असणार्‍या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका हा आदर्शवत सहकाराचे मॉडेल तसेच सहकाराची पंढरी म्हणून ओळखला जातो. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील 23 गावांमधील सहकारी सेवा सोसायटींची निवडणूक बिनविरोध झाल्याची माहिती तालुका विकास अधिकारी अशोक थोरात यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना अशोक थोरात म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वांवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरला आहे. ग्रामीण विकासात अत्यंत महत्त्वाचा असणार्‍या सहकारी संस्था ह्या अत्यंत पारदर्शीपणे काम करत आहेत. त्यातून सर्वसामान्यांचा विकास व त्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण करण्याचे काम संगमनेरमधील सहकारी संस्थांनी केले आहे.

सुसंस्कृत राजकारणाच्या आदर्श तत्वांवर वाटचाल करत, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, इंद्रजित थोरात, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी, सुकेवाडी, कोंची, जाखुरी, कौठे धांदरफळ, आंबी दुमाला, म्हसवंडी, हिवरगांव पठार, कौठे मलकापूर, बिरेवाडी, कौठे बु, कौठे खु, वाघापूर, ओझर खु, मंगळापूर, कासारे, मिरपूर, मालुंजे, खांडगाव, चिंचोली गुरव पुर्व, चिंचोली गुरव पश्चिम, वेल्हाळे, निंबाळे या 23 गावांमधील सहकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. निवडणुका बिनविरोध झाल्यामुळे या सहकारी सेवा सोसायटींचा विनाकारणचा होणारा खर्च वाचणार असून हा इतर गावांपुढे आदर्श ठरला आहे.

या सेवा सोसायट्या बिनविरोध होण्यासाठी तेथील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. या बिनविरोध निवडीबद्दल या सेवा सोसायट्यांचे नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव पा. खेमनर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, सौ. दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, सत्यजीत तांबे, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, बाबासाहेब ओहोळ, इंद्रजीत थोरात, बापूसाहेब गिरी, प्रकाश कडलग, तालुका विकास अधिकारी अशोक थोरात आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com