आंब्याच्या झाडाला गळफास घेत एकाची आत्महत्या

आंब्याच्या झाडाला गळफास घेत एकाची आत्महत्या

तळेगाव दिघे (वार्ताहर)

संगमनेर तालुक्यातील वडगावपान शिवारात असलेल्या तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलाव परिसरात आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत एकाने आत्महत्या केली.

नामदेव सुखदेव साळवे ( वय ३५ वर्ष, रा. निळवंडे ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. आज शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येच्या या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

वडगावपान शिवारातील प्रादेशिक योजनेच्या साठवण तलाव परिसरात आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत नामदेव सुखदेव साळवे यांचा मृतदेह आढळून आला. भीमराज तुळशीराम गायकवाड यांच्या शेतातील विहिरीच्या बाजूला आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह लटकलेला होता. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे व मयताचे सासरे अर्जुन गायकवाड ययांनी संगमनेर तालुका पोलिसांना माहिती दिली.

पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह झाडावरून खाली घेत पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी हलविला. याप्रकरणी उत्तम रामचंद्र भालेराव ( रा. मालदाड ) यांनी खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विष्णू आहेर अधिक तपास करीत आहे. सदर व्यक्तीने आत्महत्या का केली ? याचे निश्चित कारण मात्र समजू शकले नाही. या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com