संगमनेरात विद्यार्थ्याचे लॅपटॉप व मोबाईलची चोरी

संगमनेरात विद्यार्थ्याचे लॅपटॉप व मोबाईलची चोरी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

घुलेवाडी येथील साईदीप कॉम्प्लेक्स येथे रुमवर राहणार्‍या विद्यार्थ्याचे दोन लॅपटॉप व दोन मोबाईल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

साईनाथ शांताराम भालेराव (रा. पंतनगर, नायडु कॉलनी, घाटकोपर मुंबई, हल्ली रा. अमृतवाहिनी कॉलेज घुलेवाडी) हा विद्यार्थी साईदीप कॉम्प्लेक्स येथे रुम नंबर 7 मध्ये त्याच्या मित्रांसोबत राहत आहे. काल दि. 2 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने उघड्या रुममधून 15 हजार रुपये किमतीचा लिनोव्हो कंपनीचा लॅपटॉप, 20 हजार रुपये किमतीचा डेल कंपनीचा लॅपटॉप, 5 हजार रुपये किमतीचा समॅसंग कंपनीचा मोबाईल, 15 हजार रुपये किमतीचा विवो कंपनी मोबाईल असा एकूण 55 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला आहे.

याबाबत शहर पोलीस ठाण्यात साईनाथ भालेराव याने फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड संहिता 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक डुंबरे करत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com