संगमनेरात कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा

500 किलो गोमांससह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त || 9 जनावरांची सुटका, दोघे अटकेत
संगमनेरात कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

राज्यात गोवंश हत्याबंदी असताना संगमनेरात सुरू असलेल्या कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकून 500 किलो गोवंशासह 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 9 जनावरांची सुटका केली आहे. या छाप्यात पोलिसांनी तीन वाहनांसह दोघा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील कोल्हेवाडी रोड परिसरात बेकायदेशिर कत्तलखाना सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांना समजली. त्यानुसार पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात सुमारे 60 हजार रुपये किंमतीचे 300 किलो गोवंश जनावरांचे मांस, कुर्‍हाड, दोन सुर्‍या, एक वजनकाटा, एक छोटा हत्ती वाहन एम. एच. 17 ए. जी. 3016, एक मारुती स्वीप्ट कार क्रमांक एम. एच. 02 बी. जी. 6525, छोटा हत्ती वाहन क्रमांक एम. एच. 04 ई. वाय 3495, एक महिंद्रा कंपनीचा पिकअप क्रमांक एम. एच. 14. एफ. टी. 2772, तीन गोवंश गायी असा एकूण 11 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याबाबत पोलीस नाईक सचिन उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साहिल उर्फ साद मुस्ताक कुरेशी, सालीम मुस्ताक कुरेशी (रा. कोल्हेवाडी रोड, संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 525/2022 भारतीय दंड संहिता 269, 429 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1995 चे सुधारीत कलम 5(अ), 1,9(क) (अ) व प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंध कायदा कलम 3,11 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. वरील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून तिघेजण पसार आहेत.

तसेच जमजम कॉलनी परिसरात मोना प्लॉट शेजारी असलेल्या काटवानात कत्तल करण्याच्या उद्देशाने काही जनावरे बांधलेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात 4 गोवंश गायी व एक गोर्‍हा अशी 45 हजार रुपये किमतीची जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली. सदर जनावरांना कत्तल करण्याच्या उद्देशाने विना चारा पाणी देता निदर्यतेने दावणीला बांधून ठेवणार्‍याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल रामकिसन मुखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोनही कारवायांमध्ये ताब्यात घेतलेली एकूण 9 जनावरे सायखिंडी शिवारातील पांजरपोळ येथे पाठविण्यात आली आहेत.

सदर गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. जाणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. शेख करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com