संजय राऊतांवरील कारवाईच्या विरोधात संगमनेरमध्ये शिवसैनिक आक्रमक

संजय राऊतांवरील कारवाईच्या विरोधात संगमनेरमध्ये शिवसैनिक आक्रमक

संगमनेर | प्रतिनिधी

शिवसेनेचे फायरब्रँड प्रवक्ते व भाजपा विरोधात उघडपणे भूमिका घेणाऱ्या खा. संजय राऊत यांच्यावर ई.डी.ने कारवाई करत त्यांना अटक केली, या पार्शभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वात जिल्हाभरात आंदोलन व निदर्शने करण्यात आले. संगमनेर येथे शिवसैनिकांनी ईडी व भाजप केंद्र सरकार चा निषेध केला.

यावेळी खेवरे म्हणाले "महाविकास आघाडी सरकार घडवण्यासाठी विशेष भूमिका निभावलेले शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपा व केंद्रसरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे, विरोधकांवर मुद्दाम खोटे आरोप करून केंद्रीय यंत्रणा हाताशी वापरून भाजपा देशभरात हे कृत्य करत आहे भविष्यात जनताच याला उत्तर देईल.. या आधी देखिल भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी आरोप केलेल्या इतर पक्षातील नेत्यांना भाजप प्रवेशा नंतर क्लीन चिट कशी मिळते हा देखिल विचार करण्याचा विषय आहे..

संगमनेर बस स्थानक परिसरात झालेल्या आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे, शिवसेना तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवत घोषणाबाजी केली व किरीट सोमय्या यांचा फोटो जाळण्यात आला. यावेळी शिवसैनिकांसह पदाधिकाऱ्यांनी ईडी च्या कारवाईचा तीव्र घोषणाबाजी करत निषेध केला.

या प्रसंगी माजी उपजिल्हा प्रमुख दिलीप साळगट, शिवसेना शहर प्रमुख प्रसाद पवार, शिवसेना कामगार सेना जिल्हाप्रमुख मुजीब भाई शेख, नागपूर संपर्कप्रमुख नरेश माळवे, जयवंत पवार, संगमनेर विधानसभा प्रमुख संजय फड, शहर संघटक पप्पू कानकाटे, उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, विकास डमाळे, दीपक वनम, वेणुगोपाल लाहोटी, फैसल सय्यद, रवि गिरी, बाजीराव पाटिल कवडे, सचिन साळवे, राजाभाऊ सातपुते, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवा सेना शहर प्रमुख अमोल डुकरे, अमोल कवडे, शरद कवडे, अक्षय बिल्लाडे, विजू भागवत, समिती सदस्य अशोकराव सातपुते संदीप राहणे, संभाव लोढा, शिवसेना सचिव प्रथमेश बेल्हेकर, दीपक साळुंखे, सुदर्शन इटप , गोविंद नागरे, संकेत घोडेकर, अपंग सेना जिल्हाप्रमुख जालिंदर लहांमगे, शहर समन्वयक भाई तांबोळी, आजीज मोमीन, भाऊ चव्हाण, उपतालुकाप्रमुख काळे, कांचन गायकवाड, त्रिलोक कतारी, प्रशांत खजुरे , माधव फुल माळी, उप तालुका प्रमुख अमित फटांगरे ,अनिल खेमनर, सदाशिव हासे ,अकोल्याचे नितीन नाईकवाडी माधवराव तिटमे, शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख शीतल हासे, उपजिल्हाप्रमुख मंगल ताई घोडके, सुरेखाताई गुंजाळ , आशा केदारी, बाळासाहेब घोडके आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com