संगमनेर-शिबलापूर मार्गे राहुरी नगर बस सुरु करण्याची मागणी

बस सेवा (File Photo)
बस सेवा (File Photo)

दाढ खुर्द |वार्ताहर| Dadh Khurd

संगमनेर-शिबलापूर मार्गावरील राहुरी नगर बस आठ दिवसांत सुरू न झाल्यास एसटी डेपो संगमनेरच्या विरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा दाढ खुर्द ग्रामस्थांनी दिला आहे.

दाढ खुर्द येथे गेल्या चार वर्षांपासून करोना आजाराचे कारण देत संगमनेर बस डेपोने या भागातील संगमनेर- राहुरी, संगमनेर नगर, संगमनेर -पिंपरी- खळी या मुक्कामी तीन बसेस बंद केल्याने येथील नागरिकांना व शाळकरी मुला-मुलींना व कामगारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

त्यामुळे येथील लोकप्रतिनिधींनी नागरिकांची अडचण समजून या तीनही बस तात्काळ सुरू करण्याचे आदेश वाहतूक नियंत्रक संगमनेर बस आगार यांना द्यावे, अन्यथा बस आगार प्रमुखाच्या विरोधात दाढ खुर्द येथील ग्रामस्थांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा काँग्रेस पक्षाचे आश्वी गटाचे गटनेते किशोर जोशी, कहार समाज संघटनेचे कैलास कहार, लहुजी सेनेचे डॉ. राजेंद्र साळवे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई पक्षाचे शाखाप्रमुख राजेंद्र जमदाडे, उपशाखाप्रमुख भाऊराव वाघोजी साळवे, मल्हार सेनेचे हरिभाऊ जोरी, माळी महासंघाचे नितीन पाबळे, सुनील जोशी, सतीश उर्फ माऊली वाघमारे आदींनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com