पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर काम करा
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
जिल्ह्यात अद्यापपर्यंत पुरेसा पाऊस न झाल्याने टंचाईची परिस्थिती (Scarcity Conditions) आहे हे मान्य करावे लागेल. टंचाईत पिण्याचे पाणी (Water) व चारा (Fodder) उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे. पदाधिकार्यांनी केवळ तक्रारी न करता समन्वय साधून सामान्य माणसाला न्याय मिळवून द्यावा.जनतेच्या मनातील सरकार असल्याने जनतेला न्याय देण्याची भूमिका सर्वांनी घ्यावी. यात हलगर्जीपणा झाल्यास गय नाही, अशा सूचना महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue, Animal Husbandry and Dairy Development Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिल्या.
संगमनेर तालुका टंचाई आढावा बैठक (Sangamner Taluka Scarcity Review Meeting) महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ (Collector Siddharam Salimath), जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर (CEO Ashish Yerekar), अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराडे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, नितीन दिनकर, श्रीराम गणपुले, अमोल खताळ, आबासाहेब थोरात, सोमनाथ कानकाटे उपस्थित होते.
यावेळी गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी संगमनेर पाणी टंचाईचे सादरीकरण केले. संगमनेर मध्ये दि. 20 सप्टेंबर पर्यंत 39 टक्के पर्यंत 137 मिलीमीटर पाऊस पडला आहे. 47 टंचाई गावापैंकी 21 गावात 25 हजार 774 व्यक्तींसाठी पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे सांगितले.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, संगमनेरमध्ये 38 टक्के पाऊस झाला आहे. आपल्यासमोर पिण्याच्या पाण्याचे आवाहन आहे. धरणातील पाणी आपण पिण्यासाठी राखून ठेवले आहे. भीषण टंचाईला आपण सामोरे जात आहोत. माणसांसोबत जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपल्याला सोडवावा लागणार आहे. चारा उत्पादनाचा आपल्यापुढे प्रश्न आहे. चारा निर्मिती करण्यास आपण प्राधान्य देत आहोत. शेतकर्यांनी चारा उत्पादन करावे आपण विकत घेऊ. शेतकर्यांना 6 रूपये किलोने मुरघास उत्पादन केले जाणार आहे. तहसीलदार किंवा गटविकास अधिकारी यांच्या अहवालावर गावांना टँकरने पुरवठा करण्यात येईल. चारा मागणी असेल ती नोंदवावी, असे आवाहन केले.
गावकर्यांची मागणी आल्यापासून पाच दिवसात टँकर सुरू झाला पाहिजे, जीवन प्राधिकरणाच्या सर्व योजना कार्यान्वित करण्यात याव्यात, टँकरचे वेळापत्रक तयार करावे, ग्रामसेवक व तलाठ्यांनी हजर राहिले पाहिजे, शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, अशा सूचनाही ना. विखे पाटील याऩी दिल्या. पठार भागात प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी व तहसीलदारांनी पाहणी दौरे करावेत. पठार भागाचा स्वतः दौरा करून समस्या समजून घेणार असल्याचे ही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी महसूल, जिल्हा परिषद, पाणी पुरवठा, बांधकाम, महावितरण या विभागाचे अधिकारी उपस्थित होते.