संगमनेरातील रिक्षा वाहतुकीला शिस्त लावावी

शिवसेनेची वाहतूक पोलिसांकडे मागणी
File Photo
File Photo

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

बेकायदेशीर रिक्षा व्यवसायामुळे शहरांमध्ये अपघाताचे प्रमाण वाढले. या अपघातामध्ये जीवितहानी होत असल्याने वाहतूक पोलिसांनी शहरातील रिक्षा वाहतुकीला शिस्त लावावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

बेशिस्त व्यवसायामुळे शहरांमध्ये अपघातांचे प्रमाण वाढल्याने या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात शिवसेना पदाधिकार्‍यांनी म्हटले आहे की, संगमनेर बस स्थानक व इतर वेगवेगळ्या ठिकाणी रिक्षाचे थांबे आहेत. रिक्षा स्टॉपवरून विद्यार्थी व नागरिकांची प्रवासी वाहतूक केली जाते. बर्‍याचवेळा परवानगी पेक्षा अधिक प्रवासी भरल्याने, पुढील सीटवर प्रवासी बसल्याने अपघात होतात त्या अपघातात रिक्षा चालक किंवा प्रवाश्यांना जीव गमवावे लागतात. संभाव्य अपघात टाळावे यासाठी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे.अपघात मुक्त संगमनेर व्हावे एवढाच शिवसेनेचा उद्देश असल्याचे या निवेदनाद्वारे म्हटले आहे.

आमचे रिक्षा चालक बांधवां सोबत कोणतेही वैर नसून शिवसेना प्रणित रिक्षा संघटना देखिल आहे तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक रिक्षा चालकांना पोस्ट विभागाचा विमा देखील शहर शिवसेनेने काढला असल्याचे शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कतारी यांनी सांगितले.

शहरातील वाढते अपघात रोखावेत यासाठी पोलिसांनी त्वरित पावले उचलावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे, उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, विकास डमाळे, दीपक वनम, वेणुगोपाल लाहोटी, फैसल सय्यद रवि गिरी, सचिन साळवे, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवा सेना शहर प्रमुख अमोल डुकरे, राजाभाऊ सातपुते, शरद कवडे, अक्षय बिल्लाडे, विजू भागवत, पंचायत समिती सदस्य अशोकराव सातपुते, संदीप राहणे, वैभव अभंग, संभव लोढा, शिवसेना शहर सचिव प्रथमेश बेल्हेकर, दीपक साळुंखे, नारायण पवार, केवल कतारी, गोविंद नागरे, संकेत घोडेकर, शहर समन्वयक आसिफ भाई तांबोळी, संजय फड, आजीज मोमीन, भाऊ चव्हाण उपतालुकाप्रमुख सोमनाथ काळे, कांचन गायकवाड, त्रिलोक कतारी, प्रशांत खजुरे, उप तालुका प्रमुख अमित फटांगरे, तसेच शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख शीतलताई हासे, उपजिल्हाप्रमुख मंगल ताई घोडके, सुरेखाताई गुंजाळ, आशा केदारी यांनी मागणी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com