संगमनेरात ‘त्या’ ललनेची पोलिसांकडून शोधाशोध सुरु

संगमनेरात ‘त्या’ ललनेची पोलिसांकडून शोधाशोध सुरु

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर बसस्थानक (Sangamner Bus Stand) परिसरात मध्यरात्री फिरणार्‍या एका महिलेबाबत (Woman) वृत्त दै. सार्वमत मध्ये प्रसिद्ध होताच शहर पोलीस (Police) कामाला लागले आहे. पोलिसांच्या एका पथकाने रात्री अकरानंतर बसस्थानक (Bus Stand) परिसरात येऊन सदर महिलेची (Woman) शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर महिला काल रात्री या परिसरात फिरकलीच नाही. पोलिसांनी यावेळी काही तरुणांची चौकशी (Inquiry) केली.

गेल्या काही दिवसांपासून एक महिला रात्री संगमनेर बसस्थानक (Sangamner Bus Stand) परिसरात येते. एका मध्यस्तीच्या मार्फत ती या परिसरात सावजाच्या शोधात फिरत असते. काही जण तिला आपल्या गाडीवर घेऊन जातात. सदर महिला रात्रीच्या वेळी शरीर विक्रीचा व्यवसाय (Prostitution) करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील अनेक प्रतिष्ठित यांना तिने नादी लावले आहे. तिच्या भेटीसाठी आतुर असलेले अनेक जण रात्री अकरानंतर बसस्थानक परिसरात घिरट्या घालत असतात. शरीर विक्री व्यवसायाचा (Prostitution) नवीन फंडा तिने अमलात आणल्याने तिच्या या कारनाम्याची शहरात खमंग चर्चा सुरू आहे. याबाबत दैनिक सार्वमत मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.

या वृत्ताची शहर पोलिसांनी (City Police) गंभीर दखल घेतली असून पोलीस अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार एका पोलीस उपनिरीक्षकांसह (Sub-Inspector of Police) दोन पोलिस कर्मचार्‍यांच्या पथकाने काल रात्री 11 नंतर बसस्थानक परिसरात झाडाझडती घेतली. पोलिसांना सदर महिला आढळली नाही. पोलीस आल्याचा तिला सुगावा लागल्याची शक्यता असून यामुळेच ती त्या रात्री या परिसरात फिरकली नाही. बसस्थानक आवारात (Bus Stand) बसलेल्या काही तरुणांची पोलिसांनी चौकशी (Police Inquiry) केली. पोलीस आलेले असताना एक जण संशयास्पदरीत्या बसस्थानक परिसरात फिरत होता. हा तरुण सदर महिलेचा दलाला असल्याचे चर्चा आहे. पोलिसांना अंदाज आल्याने तोही त्वरीत पसार झाल्याने पोलिसांना हात हलवत परत जावे लागले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com