संगमनेर पोलिसांनी तीनशे किलो गोमांस पकडले

संगमनेर पोलिसांनी तीनशे किलो गोमांस पकडले

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

एका कारमधून तीनशे किलो गोमांस घेऊन जाणारी कार संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने मंगळवार दि. 5 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता सायखिंडी फाट्यावर पकडली आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना एका कारमधून गोमांसाची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने सापळा लावून ही कार सायखिंडी फाट्यावर पकडली असता त्यात गोवंश जातीच्या जनावरांचे तीनशे किलो गोमांस आढळले.

याप्रकरणी पोलीस नाईक लुमा भांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंजर बशीर खान (वय 21, रा. जुन्नर, जि. पुणे) याच्यावर गु.र.नं.784/2023 भादंवि कलम 269, 429, महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5 (क), 5 (अ), 9 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महाले करत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com