फ्लॅटमध्ये सुरू होणाऱ्या रुग्णालयास विरोध

फ्लॅटमध्ये सुरू होणाऱ्या रुग्णालयास विरोध

संगमनेर l शहर प्रतिनिधी

शहरातील नवीन नगर रोड परिसरातील एका फ्लॅटमध्ये सुरू होणाऱ्या रुग्णालयास इमारतीतील रहिवाशांनी विरोध केला आहे. नगरपालिकेने या रुग्णालयास परवानगी देऊ नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

फ्लॅटमध्ये सुरू होणाऱ्या रुग्णालयास विरोध
अंभोरे खून प्रकरणात तिघांना जन्मठेपेची शिक्षा

शहरातील नवीन नगर रोड परिसरात एका वैद्यकीय व्यावसायिकाने त्यांचे बाल रुग्णालय त्रयस्थ व्यक्तिस भाड्याने दिलेले आहे. सर्वे नंबर १५१/१७९ मधील इमारतीमध्ये तळमजल्यावर काही व्यावसायिक गाळे आहेत. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हॉस्पिटल आहे. ही इमारत रहिवासी स्वरूपाची असून इमारतीमध्ये तीन कुटुंब वास्तव्यास आहेत. इमारतीमध्ये नवीन रुग्णालय सुरू होणार असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अगोदरच नागरिकांच्या मनात भीती असताना या रुग्णालयांमध्ये इमारतींमधील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. यामुळे या ठिकाणी होणाऱ्या रुग्णालयास परवानगी देऊ नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

फ्लॅटमध्ये सुरू होणाऱ्या रुग्णालयास विरोध
तरूणाची आत्महत्या; गंगामाई कारखान्यांच्या तिघांविरूद्ध गुन्हा

इमारतीमध्ये राहणारे राजेश अशोक गुप्ता यांनी याबाबतचे निवेदन संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. या इमारतीत कुठलीही सुविधा नाही, पार्किंगची व्यवस्था नाही, संबंधित डॉक्टरने रुग्णालय सुरू करण्याबाबतचे कोणतेही परवाने घेतले नाही. यामुळे नियोजित रुग्णालय हे बेकायदेशीर असून नगरपालिकेने या रुग्णालयास परवानगी देऊ नये, अशी मागणी गुप्ता यांनी केली आहे.

फ्लॅटमध्ये दवाखान्याला परवानगी कशी ?

नवीन नगर रोड परिसरातील या इमारतीमध्ये अगोदरच एका दवाखान्याला परवानगी देण्यात आलेली आहे. कुठलीही सुविधा नसताना या दवाखान्याला परवानगी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दवाखान्याला परवानगी कशाच्या आधारावर दिली? असा सवाल आता विचारला जात आहे. आरोग्य खात्याचे शहरातील रुग्णालयांकडे दुर्लक्ष असल्याने असे बेकायदेशीर दवाखाने मोठ्या प्रमाणावर सुरू होत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com