संगमनेरातील नाटकी, म्हानुटी या नद्या अतिक्रमणामुळे लुप्त, उरल्या फक्त गटारी

संगमनेरातील नाटकी, म्हानुटी या नद्या अतिक्रमणामुळे लुप्त, उरल्या फक्त गटारी

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

एकेकाळी संगमनेरचे वैभव असणार्‍या व शहराच्या कडेने किमान तीन महिने दुथडी भरून वाहणार्‍या नाटकी व म्हानुटी या दोन नद्या गायब झाल्यात जमा आहे. वाढते अतिक्रमण याला कारणीभूत ठरले असून या नद्यांचे रुपांतर छोट्या गटारी मध्ये झाले आहे.

संगमनेर शहरांमधून प्रवरा, म्हाळुंगी या दोनच नद्या सध्या अस्तित्वात आहे. या दोन नद्यांशिवाय नाटकी, म्हाणुटी या नद्या पण अस्तित्वात होत्या. या दोन्ही नद्यांना एके काळी भरपूर पाणी असायचे. संगमनेर तालुक्यातील खांजापूर येथील धरणातून नाटकी नदीला पाणी यायचे. खांजापूर सुकेवाडी पुनर्वसन कॉलनी ज्ञानमाता विद्यालय कोल्हेवाडी रोड या भागातून वाहणारी नाटकी नदी नंतर जोर्वे रोड परिसरात प्रवरा नदीला मिळायची.

दरवर्षी पावसाळ्यात या नदीला भरपूर पाणी असायचे. खांजापूर तेथील धरण भरल्यानंतर नाटकी नदीला पाणी सोडले जायचे दुथडी भरुन हि नदी वाहयची. दिवाळीच्या महिन्यापर्यंत या नदीला पाणी असायचे, म्हानुटी नदीची अवस्था ही अशीच असायची शहरातील पश्चिमेच्या बाजूने हि नदी वाहत होती. या नद्यांना पूर आल्याचे अनेकांनी पाहिले आहे. एकेकाळी संगमनेरचे वैभव असणार्‍या या नद्या आता मात्र गायब झालेल्या आहेत. या नदीपात्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहे.

अनेक वर्षापासून नद्यांना पाणी येत नसल्याने अनेक नागरिकांनी याचा गैरफायदा घेत अतिक्रमण केलेले आहे. चारशे फुटांहून अधिक लांबीचे नदीपात्र असणार्‍या या नद्या आता अस्तित्वातही नाही, याऐवजी त्यांचे रूपांतर छोट्या गटारींमध्ये झाले आहे.

नद्या गायब झाल्या तरी पुराचा धोका कायम

संगमनेर शहरातून वाहणार्‍या या नद्या गायब झालेल्या असल्या तरी या नद्यांना पुराचा धोका कायम आहे. अनेक वर्षांपासून या नदीपात्रात पाणी नसेल तरी पावसाळ्यात कोणत्या क्षणी नदीला पुर येऊ शकतो याचा अनुभव संगमनेरकरांनी घेतलेला आहे. आठ वर्षांपूर्वी नाटकी नदीला अचानक मोठा पूर आला होता. या पुरामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले होते. सुकेवाडी रस्त्यावरील पुनर्वसन कॉलनी पूर्ण पाण्यात गेली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com