संगमनेर नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेमध्ये निवडणूक आयोगाच्या आदेशांचे उल्लंघन

माजी उपनगराध्यक्ष जहागीरदार यांची तक्रार
संगमनेर नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेमध्ये निवडणूक आयोगाच्या आदेशांचे उल्लंघन

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना करताना राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पूर्णपणे उल्लंघन करण्यात आले आहे. राजकीय दबावाखाली अधिकार्‍यांनी प्रभागातील किमान व कमाल लोकसंख्या याकडे दुर्लक्ष केले असून शहरातील काही प्रभाग जाणीवपूर्वक कमी मतदारांचे करण्यात आले आहे, अशी तक्रार माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार यांनी केली आहे.

याबाबत राज्य निवडणूक आयोगाला आयोगाला पाठवलेल्या तक्रार अर्जात त्यांनी म्हटले आहे की, राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र अधिसूचना क्रमांक राजिआ/नप-2000/प्र.क्र.02/का-6 दि. 22 फेब्रुवारी 2022 नुसार संगमनेर शहरातील प्रभाग रचना करण्यात आली. ही रचना करताना राज्य निवडणूक आयोगाचे आदेशाचे पूर्णपणे उल्लंघन करण्यात आले आहे.

संगमनेर नगरपरिषदेची प्रभाग रचना करताना असतांना अधिकारी राजकीय दबावखाली काम करीत होते. शहरातील प्रभागांची लोकसंख्येनुसार रचना करण्यात आलेली नाही. शहरातील काही प्रभाग किमान व कमाल लोकसंख्यापेक्षा मोठे करण्यात आले व ज्या प्रभागात सत्ताधार्‍यांचे वर्चस्व आहे ते प्रभाग कमी मतदार संख्येचे करण्यात आलेले आहे. निष्पक्ष निवडणूक होण्यासाठी नव्याने प्रभाग रचना करण्यात यावी, अशी मागणी जहागीरदार यांनी केली आहे.

या तक्रार अर्जासोबत त्यांनी संगमनेर शहरातील सर्व प्रभागांची लोकसंख्या असणारी यादी जोडलेली आहे. संगमनेर नगरपरिषदेचे एकूण 15 प्रभाग असून प्रत्येक प्रभागातून दोन अशा एकूण जागांसाठी निवडणूक होणार आहे. संगमनेर शहरातील मतदारांची संख्या 65 हजार 804 एवढी आहे. एकूण मतदारांची संख्या व एकूण प्रभागांची संख्या यांचा भागाकार केला तर सरासरी 4 हजार मतदार एका प्रभागात अपेक्षित आहे. अनेक प्रभागात चार हजार पेक्षाही जास्त मतदार आहे तर काही प्रभागात ही मतदार संख्या साडेतीन हजार व त्यापेक्षाही कमी आहे. यामुळे जहागीरदार यांनी संगमनेरच्या प्रभाग रचनेवर आक्षेप घेतलेला आहे. निवडणूक आयोग या तक्रार अर्जाची कशी दखल घेते याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com