संगमनेरात कांदा व डाळींबला मिळतोय 'हा' भाव
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
संगमनेर बाजार समितीमध्ये (Sangamner Market Committee) विक्रीसाठी आलेल्या एक नंबर कांद्यास (Onion) 1701 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे. तर एक नंबर डाळींब (Pomegranate) 7 हजार रुपये प्रति क्रेटस बाजारभाव मिळाला आहे. डाळींबाला (Pomegranate) उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे.
बाजार समितीवर कांद्याची (Onion) 7887 गोणीची आवक झाली होती. तर डाळींबाचे (Pomegranate) 1782 क्रेटस इतकी आवक झाली होती. एक नंबर कांद्यास (Onion) रुपये 1500 ते 1701, दोन नंबर कांद्यास रुपये 1000 ते 1400, तीन नंबर कांद्यास (Onion) रुपये 500 ते 1000, गोल्टी कांद्यास (Onion) रुपये 300 ते 700, खाद कांद्यास (Onion) रुपये 150 ते 351 याप्रमाणे बाजार भाव मिळाले. तर 1782 क्रेटस डाळींब (Pomegranate) शेतमालाची आवक बाजार समितीवर झाली होती. एक नंबर डाळींबास (Pomegranate) रुपये 5000 ते 7000, दोन नंबर डाळींबास (Pomegranate) रुपये 3000 ते 4000, तीन नंबर डाळींबास (Pomegranate) 500 ते 2000 पर्यंत भाव मिळाले आहे.
संगमनेर बाजार समितीमध्ये (Sangamner Market Committee) आठवड्यातून सोमवार ते शुक्रवार या सलग पाच दिवशी शेतकरी वर्गाने आपला कांदा (Onion) व डाळींब (Pomegranate) या शेतमालास योग्य बाजार भाव मिळण्यासाठी लिलावाच्या दिवशी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत व कांदा (Onion) 50 किलो बारदान गोणीत, वाळवून, निवड करुन तसेच डाळींब ((Pomegranate)) शेतमाल आणताना योग्य प्रतवारी करुनच बाजार समितीमध्ये विक्रीसाठी बाजार समितीच्या आवारात आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव सतिष गुंजाळ यांनी केले आहे.