संगमनेर : कांदा 3151 रुपये

संगमनेर : कांदा 3151 रुपये

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल 10 हजार 236 कांदा गोणींची आवक झाली. एक नंबर कांद्यास 3151 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली.

एक नंबर कांद्याला 3151 रुपये प्रति क्विंटल, 2 नंबर कांद्याला 1826 रुपये तर 3 नंबर कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले. तर 500 क्रेटस टोमॅटोची आवक झाली. 100 रुपये ते 250 रुपये प्रति क्रेटस असा बाजारभाव मिळाला. तर सरासरी बाजारभाव 175 रुपये प्रति क्रेटस मिळाला. शेतकर्‍यांनी आपला शेतीमाल प्रतवारी करून संगमनेर बाजार समितीवर विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सचिव सतीश गुंजाळ यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com