संगमनेरात कांद्याला आज मिळाला हा भाव

संगमनेरात कांद्याला आज मिळाला हा भाव

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर (Sangamner) येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Produce Market Committee) दिनांक 20 जून रोजी झालेल्या कांदा मार्केटमध्ये (Onion Market) 12 हजार 198 कांदा गोणीची आवक (Onion Inward) झाली. एक नंबर कांद्याला (Onion) 1701 रुपये प्रति क्विंटल असा बाजार भाव मिळाला.

कांद्यास पुढील प्रमाणे बाजार भाव मिळाले.नं.1 रु 1200 ते 1400. नं.2 ला रु.1000 ते 1200, नं. 3 ला रु. 800 ते 1000, गोल्टी रु. 700 ते 1000, खाद रु. 150 ते 551 प्रमाणे बाजार भाव मिळाले आहेत.

तसेच डाळींब (Pomegranate) 616 जाळ्यांची आवक झाली. डाळींबाला (Pomegranate) 500 ते 3401 रुपये बाजार भाव मिळाला. तर टोमॅटो 8200 जाळ्यांची आवक (Inward) झाली. टोमॅटोला 200 ते 700 रुपये प्रति जाळी असा बाजार भाव मिळाला. भुईमूग ओली शेंगाची 7 गोणी आवक होवून 3801 ते 4600 रुपये बाजारभाव मिळाला.

संगमनेर बाजार समितीमध्ये आठवड्यातून सोमवार ते शुक्रवार या सलग पाच दिवशी शेतकरी वर्गाने आपला कांदा योग्य बाजारभाव मिळण्यासाठी लिलावाच्या दिवशी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत व कांदा 50 किलो बारदान गोणीत, वाळवून, निवड करुन बाजार समितीमध्ये विक्रीसाठी बाजार समितीच्या आवारात आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, सर्व संचालक मंडळ व सचिव सतिष गुंजाळ यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com