संगमनेर तालुक्यात बिबट्यांचे भय संपेना!

संगमनेर तालुक्यात बिबट्यांचे भय संपेना!

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर शहर (Sangamner) व तालुक्यात बिबट्यांनी (Leopard) धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील अनेक गावात व शहरालगतच्या उपनगरामध्ये बिबट्यांचा (Leopard) वास्तव्य असल्याने नागरिक भयभीत झाले आहे.

संगमनेर तालुक्यात बिबट्यांचे भय संपेना!
इगतपुरी तालुक्यातील शाळेच्या सहलीच्या बसला अपघात

तालुक्यामध्ये शंभरहून अधिक बिबटे वास्तव्यास असल्याची माहिती असून वन खात्याने या बिबट्यांचा (Leopard) त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. डोंगर व जंगलामध्ये आढळणारा बिबट्या आता नागरी वस्तीतही आढळू लागला आहे. डोंगर परिसरात नागरी वस्त्या वाढल्याने अन्नाच्या शोधात अनेक बिबट्यांनी (Leopard) नागरी वस्तीकडे येत आहे. तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये बिबटे सर्रासपणे आढळत आहे.

संगमनेर तालुक्यात बिबट्यांचे भय संपेना!
प्रशासन सुधारण्यासाठी अभिप्रायांचा आधार

संगमनेर शहर परिसरातील कोल्हेवाडी रोड, ताजने मळा, गुंजाळ नगर परिसर, घुलेवाडी, सुकेवाडी, वेल्हाळे या भागामध्ये गेले काही दिवसांपासून बिबटे आढळत आहे. या परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. अनेक कुत्रे (Dog) शेळ्या (Goat) यांची बिबट्यांनी शिकार केलेली आहे. संगमनेर (Sangamner) शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर चोर्‍या होत आहेत. चोरट्यांमुळे भयभीत झालेले असतानाच बिबट्यांचाही धुमाकूळ सुरू असल्याने नागरिक आणखी भयभीत झालेले आहे.

संगमनेर तालुक्यात बिबट्यांचे भय संपेना!
डोक्यात लाकडी दांडा मारून जिवे मारण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

नागरिकांच्या मागणीनुसार बिबट्यांना पकडण्यासाठी वन खात्याने काही ठिकाणी पिंजरे लावलेले आहेत. पिंजर्‍यांची संख्या कमी असल्याने वन खात्याच्या कर्मचार्‍यांची गैरसोय होत आहे. वन खात्याने पिंजर्‍यांची संख्या वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

पिंजर्‍याला बिबट्यांची प्रतीक्षा

संगमनेर शहराच्या गुंजाळ नगर परिसरातील कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार वन खात्याने दोन दिवसापूर्वी पिंजरा लावला आहे. मात्र नागरिकांना अनेकदा आढळलेले दोन बिबटे या पिंजर्‍यात जायला तयार नाही, त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com