अखेर तालुक्यात कोतवाल भरतीला मुहूर्त निघाला..!

अखेर तालुक्यात कोतवाल भरतीला मुहूर्त निघाला..!

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या संगमनेर तालुक्यातील कोतवाल भरतीचा मुहूर्त अखेर निघाला असून, 14 कोतवालांची पदे भरली जाणार आहेत. कोतवाल भरतीमुळे महसूल विभागाच्या कामास देखील गती येणार आहे. अशी माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली आहे. राज्यभरातील गावांमध्ये महसूल विभाग व शासनाच्या बहुतांश कामांची पूर्तता करण्यासाठी कोतवालपद महत्त्वाचे आहे.

अनेक वर्षे कोतवालपदाची भरती व्हावी, अशी मागणी होत होती. राज्य शासनाने तलाठी भरती प्रक्रिया सुरू केली असताना, कोतवाल भरती प्रक्रियेचे आरक्षण वेळापत्रक जाहीर झाले आहे. यामध्ये संगमनेर तालुक्याचा समावेश असून, तालुक्यातील चौदा तलाठी सजांमध्ये कोतवाल भरले जाणार आहेत.यासाठी आरक्षण लागू झालेले आहे. त्यानुसार आंबीखालसा ओबीसी, चिखली ओबीसी, निमोण ओबीसी महिला, संगमनेर खुर्द आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग, सांगवी आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग महिला, जवळे बाळेश्वर खुला, मालदाड खुला, पारेगाव बुद्रुक खुला, सुकेवाडी खुला, कोठे बुद्रुक खुला, चिंचपूर बुद्रुक खुला, वडझरी बुद्रुक खुला महिला, निळवंडे खुला महिला, आंबीदुमाला खुला महिला या प्रवर्गातील उमेदवारांना संधी मिळणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com