संगमनेरात 30 हजारांचे दागिने लांबविले

संगमनेरात 30 हजारांचे दागिने लांबविले

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

मोटरसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी येऊन एका महिलेच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीचे दागिने लांबविल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शहरातील गोल्डन सिटी परिसरात घडली.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, आशा चांगदेव शिंदे (वय 43, र. गोल्डन सिटी, संगमनेर) ही महिला घरातील कचरा टाकून घराकडे येत असताना मोटारसायकलवर दोन अज्ञात चोरटे याठिकाणी आले. या चोरट्यांनी सदर महिलेच्या गळ्यातील 17 ग्रॅम सोन्याची पोत बळजबरीने ओढून पलायन केले. सदर महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. याबाबत सदर महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांंनी दोघा अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 06/2022 भारतीय दंड संहिता कलम 392, 34 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक पंकज शिंदे करत आहेत.

संगमनेर शहर व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दागिने व मोटारसायकल चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत. शहर पोलिसांचे गुन्हेगारांवर नियंत्रण नसल्याने अशा घटना वाढत आहे. शहर पोलीस ठाण्यातील डीबी शाखाही कूचकामी ठरल्याने चोरांचा तपास लागत नाही. याचा चोरट्यांनी चांगलाच गैरफायदा उठवला आहेे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com