अवैध वाळू उपसा करणारा जेसीबी ड्रोनद्वारे पकडला, जिल्ह्यातील पहिलीच कारवाई

अवैध वाळू उपसा करणारा जेसीबी ड्रोनद्वारे पकडला, जिल्ह्यातील पहिलीच कारवाई

घारगाव | प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील मोरेमळा (खैरदरा,नांदूर खंदरमाळ) येथे ड्रोनचा वापर करून महसूल पथकाने अवैध वाळू उत्खनन करणारा एक जेसीबी जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (३० मे) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास करण्यात आली. अवैध वाळू वाहतुकीला चाप बसविण्यासाठी संगमनेर तालुक्यात सुद्धा ड्रोनचा वापर केला जाणार असल्याचे महसूलमंत्री विखे पाटील यांनी सोमवारी (दि.२९)संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना सांगितले होते.

याबाबत अधिकची माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे,तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी युवराजसिंग जारवाल, पोमल तोरणे, केशव शिरोळे, रामदास मुळे हे महसूल पथक नांदूर खंदरमाळ परिसरात अवैध वाळू उपसा व गौण खनिज उत्खनन संदर्भात गस्त घालत असताना पथकाने डेरेवाक (लहूचा मळा) येथून ड्रोनद्वारे पाहणी करण्यास सुरवात केली.

अवैध वाळू उपसा करणारा जेसीबी ड्रोनद्वारे पकडला, जिल्ह्यातील पहिलीच कारवाई
क्रूरतेची परिसीमा गाठली! आधी चाकूचे ४० वार, नंतर दगडाने ठेचून १६ वर्षीय प्रेयसीला संपवलं

ड्रोनची रेंज अडीच ते तीन किलोमीटरची असल्याने पथकाला मोरेमळा (खैरदरा) येथे मुळानदीलगत एका शेतात अवैध वाळूचे उत्खनन करताना जेसीबी आढळून आला. पथकाने संबधित ठिकाणी धाव घेतली. मात्र, चालकाने जेसीबी पळविण्याचा प्रयत्न करत तो मकाच्या शेतात घेऊन गेला. शेतातून मका घरी नेण्यासाठी शेतात जेसीबी नेला असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला.

मात्र, हा सर्व प्रकार जेसीबी मशिनसारख्या यांत्रिक साधनांचा वापर करून वाळूचे उत्खनन होत असतानाचे ड्रोनद्वारे प्राप्त व्हिडीओमध्ये आढळून आले असल्याने महसूल पथकाने जेसीबी ताब्यात घेतला. चौकशीअंती जेसीबी मालकाचे नाव सुरेश सुदाम मोरे (रा. मोरेमळा, खैरदरा, नांदूर खंदरमाळ) असे असून त्यांच्याकडे वाळू उत्खननाचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. सदर जेसीबी घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून दंडात्मक कारवाई करणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात येत आहे.

अवैध वाळू उपसा करणारा जेसीबी ड्रोनद्वारे पकडला, जिल्ह्यातील पहिलीच कारवाई
Chandrayaan-3 : चांद्रयान-3 ची तारीख ठरली, 'या' दिवशी उतरणार चंद्रावर

मुळाकाठी खैरदरा परिसरात बाराही महिने मोठ्याप्रमाणात वाळूउपसा

संगमनेर तालुक्यातील खैरदरा परिसरात वर्षाच्या बाराही महिने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होते. नदीला पाणी असल्यास लगतच्या शेतात जेसीबीच्या सहायाने वाळू उपसा केला जातो. कायमच संगमनेर महसूल विभागाकडून स्थानिक वाळू तस्करांना छुपा पाठींबा मिळाला असून त्यांच्या आशीर्वादाने वाळू तस्करांनी वाळू नदीवर वाळू वाहतूक करण्यासाठी स्वखर्चाने पूल टाकला होता. याभागात कायमस्वरूपी ड्रोनच्या तिसऱ्या डोळ्याने नजर ठेवली तर अवैध वाळू उपशाला लगाम बसेल.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com