संगमनेरात चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ

संगमनेरात चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर शहर (Sangamner City) व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या चोर्‍यांच्या (thieves) प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. पोलिसांची तपास यंत्रणा निष्फळ ठरत असल्याने चोरी (thieves) गेलेल्या अनेक वाहनांचा (vehicles) तपास अद्याप लागलेला नाही.

संगमनेर शहरात (Sangamner City) काही महिन्यांपूर्वी बदलून आलेले पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख (Police Inspector Mukundrao Deshmukh) यांनी पोलीस कर्मचार्‍यांना शिस्त लावली. यामुळे शहरात पोलिसांचे अस्तित्व जाणवायला लागले आहे. पोलिसांचे (Police) अस्तित्व जाणवायला लागले असले तरी शहर व परिसरात चोर्‍यांचे प्रमाण मात्र वाढत आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातून महत्त्वाच्या कार्यालयाच्या परिसरातून मोटारसायकली चोरी होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मोटरसायकलीच्या चोरी सोबतच घरफोड्या, किरकोळ स्वरूपाच्या चोरीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 घरफोड्या झाल्या.

65 मोटरसायकलींची चोरी झाली. दागिने चोरीच्याही घटना वाढल्या. मोठ्या प्रमाणावर चोर्‍या होत असताना पोलिसांची तपास यंत्रणा या चोरांचा तपास लावण्यात अपयशी ठरत आहे. चोरी गेलेल्या 65 मोटरसायकली पैकी अवघ्या पाच मोटरसायकल तपास पोलिसांना लावता आला आहे. घरफोडीच्या चोवीस घटनांपैकी फक्त पाच प्रकरणांचा तपास लागला आहे. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात (Police Station) अस्तित्व घातलेली तपास शाखा प्रभाव शून्य असल्याचे यातून दिसते. या शाखेतील कर्मचार्‍यांचे शहरातील गुन्हेगारीकडे दुर्लक्ष होत आहे. चोर्‍यांचे तपास लावणे ऐवजी या शाखेतील कर्मचारी अन्य कामे करण्यात मश्गुल असतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com