
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
गुटखा विक्रीस बंदी असतानाही गुटखा विक्री करताना आढळल्याने पोलिसांनी संबंधित इसमांकडून अडीच हजार रुपयांचा गुटखा जप्त केल्याची घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शहरातील मदिना नगर परिसरात घडली.
महाराष्ट्र राज्यात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व तयार करण्यास प्रतिबंध असलेली सुगंधी सुपारी व मसाला खाण्यासाठी अपायकारक आहे हे माहीत असतानाही या पदार्थांची विक्री मदिनानगर परिसरात होत असल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी याठिकाणी पाहणी केली असता युसूफ शेख विक्री करताना आढळला.
याबाबत पोलीस नाईक गजानन गायकवाड यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी युसूफ ऊर्फ पप्पू सुभान शेख (वय 52) रा. मदिनानगर गल्ली नंबर 2 याच्या विरुद्ध गु.र.न. 76/2023 भादवि कलम 188, 272, 273 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एस. के. उगले करत आहेत.