संगमनेरात गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा

File Photo
File Photo

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

राज्यात गुटखा विक्रीला बंदी असतानाही संगमनेर शहरात मात्र खुले आम गुटखा विक्री सुरू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. शहर पोलिसांनी तालुक्यातील राजापूर परिसरात काल सकाळी दहा हजार रुपयांचा गुटखा जप्त केला असून याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

File Photo
हार्वेस्टरने ऊस तोडणी केल्यास पाचटाचे वजन होणार वजा

संगमनेर शहर व परिसरात गुटखा विक्री पूर्ण बंद असल्याचा दावा संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे असल्याचे दिसत आहे. राज्यात गुटखा विक्री व उत्पादनाला पूर्ण बंदी आहे मात्र संगमनेर तालुक्यात खुलेआम दररोज लाखो रुपयांचा गुटखा विक्री होत आहे. संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची आयात केली जाते. मोठ्या गुटखा विक्रेत्यांकडून हा गुटखा छोट्या विक्रेत्यांना विकला जातो. संबंधित खात्याला याची कल्पना असतानाही गुटखा विक्रेत्यांविरुद्ध जाणीवपूर्वक कारवाई होत नसल्याचे दिसत आहे.

File Photo
कमळाच्या संकरीत प्रजातीचे नगरमध्ये संशोधन

बुधवारी साडेअकरा वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक हायवेच्या संगमनेर ते राजापुर कडे जाणार्‍या रोडचे बोगद्याजवळ पोलिसांनी अवैध गुटखा विक्री विरुद्ध कारवाई केली. या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून एक ओमनी गाडी अडवली. या गाडीची तपासणी केली असता या गाडीमध्ये 2190 रुपये किमतीचे पिवळ्या रंगाचे प्लॅस्टीकचे पाकीटे त्यावर शेयॉल 717 तंबाखू असे लिहीलेले एकूण 73 पॅकेट प्रत्येकी 30 रुपये दरा प्रमाणे, 8760 किमतीचे पिवळ्या रंगाचे प्लॅस्टीकचे पाकीटे त्यावर हिरा पान मसाला असे इंग्रजी व मराठी मध्ये लिहीलेले एकुण 73 पॅकेट प्रत्येकी एक पॅकेट व एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची सुझुकी कंपनीची राखाडी रंगाची ओमिणी गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.

File Photo
बैठकीतील कागदावर शहर विकासाला गती

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी किरण शिवाजी घारे (रा. ओमशांतीनगर, घुलेवाडी), शहानवाज आसिफ इनामदार (रा. साईबाबा कॉलनी, घुलेवाडी), जमिर पठाण (रा. कोल्हार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव हे करत आहे.

File Photo
नगर जिल्ह्यात काँग्रेसचे 17 मतदार
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com