संगमनेरात गुटखा विक्रेत्यावर छापा

मोटारसायकलसह गुटखा जप्त
संगमनेरात गुटखा विक्रेत्यावर छापा

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

राज्यात गुटखा बंदी असतांना देखील संगमनेरात सर्रास गुटखा विक्री करणार्‍या विक्रेत्यावर पोलिसांनी छापा टाकून त्यास पकडले. त्याच्याकडून 31 हजार 500 रुपयांचा गुटखा व एक मोटारसायकल असा 1 लाख 31 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकाजणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेरात गुटखा विक्रेत्यावर छापा
खड्ड्यात डांबर दाखवा 10000 रुपये मिळवा!

अबरार सलीम शेख (वय 27, रा. भारतनगर, संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. शहरात एक व्यक्ती मोटारसायकलहून गुटखा विक्री करत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना मिळाली. त्यांच्या सुचनेवरुन पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, पोलीस नाईक ए. के. दातीर, पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव, प्रमोद गाडेकर यांनी भारतनगर पसिररातील एका हॉस्पिटलजवळ सापळा लावला. रविवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास एक इसम मोटारसायकल क्रमांक एम. एच. 17 सी. टी. 7486 हून दोन गोण्या घेवून येत असतांना दिसला. त्यास पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला.

संगमनेरात गुटखा विक्रेत्यावर छापा
गडकरींना तनपुरेंनी दिले भोजनाचे आमंत्रण!

सदर मोटारसायकल बाजूला घेतल्यानंतर त्याच्या वाहनावरील गोण्यांची तपासणी केली असता त्यामध्ये पिवळ्या रंगाचे प्लॅस्टिकचे पाकीट असलेले हिरा पान मसाला असे एकूण 210 पाकिट प्रत्येकी 120 रुपये किमतीचे व पिवळ्या रंगाचे प्लॅस्टिकचे पाकिट रोयॉल कंपनीची 717 चे तंबाखुचे 210 पाकिट प्रत्येकी 30 रुपये किमतीचे असा दोन्ही मिळून 31 हजार 500 रुपयांचा सुगंधित तंबाखू व पान मसाला तसेच मोटारसायकल 1 लाख रुपये किमतीची असा एकूण 1 लाख 31 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर माल विक्री करणारा अबरार सलीम शेख यास पोलिसांनी ताब्यात घेतले.

संगमनेरात गुटखा विक्रेत्यावर छापा
तुळजापूरच्या भवानीची पालखी राहुरीतून तुळजापूरला रवाना

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अबरार सलीम शेख याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 791/2022 भारतीय दंड संहिता 188, 272, 273, 328, अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियमाचे कलम 59, 26 (2), (4) प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलीस करत आहे. आरोपी अबरार सलीम शेख यास अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com