संगमनेरात 26 पासून फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धा

संगमनेरात 26 पासून फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेरमध्ये प्रथमच संगमनेर फुटबॉल क्लबमार्फत दि.26, 27 व 28 ऑगस्ट रोजी संगमनेर फुटबॉल चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेचे उद्घाटन डॉ.संजय मालपाणी यांच्या हस्ते होणार असून उद्घाटनासाठी अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष लॉरेन्स सॅमी, सचिव गॉडविन डिक तसेच युवानेते सत्यजित तांबे यांची उपस्थिती असेल.

स्पर्धा आयोजन करण्यात सत्यजित तांबे यांचा मोलाचा हात असून त्यांच्या सहकार्याने संगमनेर फुटबॉल क्लबने गेल्या 15 वर्षांपासून संगमनेरमध्ये फुटबॉल खेळाची आवड निर्माण करून या स्पर्धेचे आयोजन करण्यास सफल ठरला आहे. संगमनेर फुटबॉल क्लबच्या तरुणांचा उत्साह पाहून युवा नेते सत्यजित तांबे यांनी स्वत:च्या जागेत मुलांना फुटबॉल खेळासाठी मैदान उपलब्ध करून दिल्याने खेळाडूंनी आभार मानले.

स्पर्धेसाठी नाशिक, पुणे, जळगांव व अहमदनगर या जिल्ह्यातील संघांनी नोंदणी केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संघांच्या स्पर्धेसाठी सहभाग दर्शविला आहे. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने रेफ्री व स्पर्धेची नियमावली उपलब्ध करून दिली आहे. बक्षिस वितरण सोहळा रविवार दि.28 ऑगस्ट रोजी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. स्पर्धेचे प्रथम बक्षिस रु.41 हजार व ट्रॉफी, द्वितीय बक्षिस रु.21 हजार व व ट्रॉफी, तृतीय बक्षिस रु.11 हजार व ट्रॉफी, उत्कृष्ठ गोलरक्षक रु.3,000/-, उत्कृष्ठ खेळाडू रु.3,000/- असे अनेक बक्षिसे ठेवण्यात आले आहेत.

या स्पर्धा आयोजित करण्यासाठी मालपाणी उद्योग समूह, गंगासृष्टी गृह प्रकल्प, सह्याद्री अ‍ॅग्रोव्हेट, सह्याद्री स्टोन क्रेशर, गुरुदत्त मोबाईल शॉपी, पिंपळे स्टोन क्रेशर आदींनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले आहे. या स्पर्धांसाठी सर्व इच्छूक संघांनी लवकरात लवकर नोंदणी करावी व तसेच प्रेक्षकांनी उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com