व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवण्यावरून दोन गटांत हाणामारी

दोन गंभीर, 9 जणांविरुद्ध गुन्हा
व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवण्यावरून दोन गटांत हाणामारी

संगमनेर (शहर प्रतिनिधी) -

व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवण्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास शहरातील जयजवान

चौकात घडली. या घटनेत दोघेजण जखमी झाले आहेत. याबाबत शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून 9 जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील इंदिरानगर येथील रहिवाशी योगेश सोमनाथ पोगुल याने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक 21 रोजी 8.30 वाजेच्या सुमारास माझ्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर कोणतेही नाव न घेता इंग्रजीमध्ये माझ्या नादी लागला तर भोंगळा करून मारेल असे स्टेटस ठेवले होते. त्यानंतर रात्री 9 वाजेच्या सुमारास अमित रहातेकर याने मला फोन करुन कोणाला भोंगळे करून मारणार आहे, असे विचारले असता त्यावेळी मी ते स्टेटसला टाकले आहे. तू कशाला मनावर घेतो. त्यावेळी त्याने मला शिवीगाळ केली. त्यानंतर अमित रहातेकर, धिरज रहातेकर, सुरज गाडे व अन्य दोनजण आमच्या घराजवळ आले. हातातील लाकडी दांडक्याने मला मारहाण करण्यात आली.

यावेळी सुरज गाडे याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने मला मारहाण केली. यावेळी माझी आई व पत्नी सोडविण्यासाठी आल्या असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.

या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 1914/2020 नुसार भारतीय दंड संहिता 324, 323, 143, 149, 148, 504 प्रमाणे अमित रहातेकर, धिरज रहातेकर, सुरज गाडे व अन्य दोन व्यक्ती यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक बोटे करत आहेत.

तर परस्परविरोधी फिर्यादीमध्ये अमित सुरेश राहातेकर याने म्हटले आहे की, त्याच्या मोबाईलमधील जयजवान चौक या व्हॉटस्अ‍ॅप गु्रपवर कोणाचेही नाव न घेता चॅटींग केली. आपण केलेली चॅट याच भागात रहाणारा योगेश पोगुल याने दिनांक 21 ऑक्टोबर रोजी त्याच्या व्हॉटस्अ‍ॅपवर स्टेटस ठेवले व इंग्रजीत ओपन नाही, भोंगळे करून मारेल माझ्या नादी लागला तर असे स्टेटस ठेवले. म्हणून आपण त्याला फोनवर विचारणा केली असता त्याने शिवीगाळ केली. त्यानंतर अर्ध्या तासाने रहातेकरचा लहानभाऊ धिरज, मित्र सुरेश गाडे, पंकज दुधे असे बसस्टँडकडे पायी जात असताना रसाळ हॉस्पिटलजवळ योगेश पोगुल याने रहातेकर यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्याचवेळी योगेश सोबत असलेले कल्पेश पोगुल, सोनु गोफणे, योगेशचे आई व पत्नी यांनी रहातेकर यास मारहाण करण्यास सुरुवात केली. रहातेकर यास दांडक्याने डोक्यात व चेहर्‍यावर मारहाण करण्यात आली. याबाबत रहातेकर याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 1915/2020 नुसार भारतीय दंड संहिता 324, 323, 143, 149, 148, 504 प्रमाणे योगेश पोगुल, कल्पेश पोगुल, सोनु गोफणे, योगेशची आई, पत्नी (सर्व रा. इंदिरानगर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलीस नाईक देशमुख करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com