खांडगाव परिसरातील प्रवरा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा

ग्रामस्थांचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन; कारवाईची मागणी
खांडगाव परिसरातील प्रवरा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा

संगमनेर l प्रतिनिधी

प्रवरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असल्याने खांडगाव ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. खांडगाव परिसरातील वाळू उपसा बंद झाला पाहिजे, अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी, संगमनेर यांना देण्यात आले आहे.

या इशार्‍याची दखल घेत वाळू तस्कर ज्या मार्गे वाळू वाहतूक करतात तो रस्ता महसूल प्रशासनाकडून जेसीबीच्या सहाय्याने खड्डे करुन बंद करण्यात आला आहे. मात्र या कार्यवाहीवर ग्रामस्थ समाधानी नसून वाळू तस्करांना कायमचा आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

खांडगाव परिसरातील प्रवरा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा
वृक्ष परिवाराचे प्रवरा नदीपात्रात झोपून 'अभिनव आंदोलन'

तालुक्यातील खांडगाव शिवारातून प्रवरा नदी पात्रातून राजरोसपणे वाळूचा बेसुमार उपसा केला जात आहे. रात्रीच्यावेळी वाळू तस्कर नदीपात्रात उतरतात. वाळू उपसा करुन 15 ते 20 ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळूची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे विहीरींना पाणी राहिले नाही. नदीचे पाणी संपले आहे. पाणी पुरवठा करणार्‍या विहीरी देखील कोरड्या ठाक पडल्या आहेत. वाळू तस्कर मुजोर झाल्याने ते स्थानिक नागरीकांना दमदाटी करतात. अंगावर ट्रॅक्टर घालण्याची धमकी देतात. महसूल प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करुन देखील काही उपयोग झालेला नाही. त्यामुळे आता ग्रामस्थांनी नदीपात्रात जावून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

वाळू उपसा बंदचा खांडगाव ग्रामपंचायतीने ठराव केलेला असतांना देखील वाळू उपसा सुरुच आहे. ज्या रस्त्याने वाळूची वाहतूक केली जाते. ते रस्ते बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी वारंवार केली आहे. त्याकडे ग्रामपंचायतसह महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. ग्रामस्थांनी नदीपात्रात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला मात्र जमाव बंदीचे आदेश असल्याने आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल होती. तेव्हा सर्व ग्रामस्थांनी मिळून प्रांताधिकारी, तहसिलदार यांना निवेदन देवू, असे थोरात कारखान्याचे संचालक रमेश गुंजाळ, उपसरपंच सोमनाथ गुंजाळ यांनी सांगत ग्रामस्थांना शांत केले. महसूल प्रशासनाकडून वाळू तस्करांवर कारवाई झाली नाही तर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आले.

खांडगाव परिसरातील प्रवरा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा
बऱ्हाणपूरच्या ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार

वाळू उपसा त्वरीत बंद करावा, वाळू तस्करांवर कारवाई करण्यात यावी, वाळू वाहतूकीचे रस्ते त्वरीत बंद करण्यात यावे, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना देण्यात आले. यावेळी भरत गुंजाळ, छायाताई गुंजाळ, रमेश गुंजाळ, सोमनाथ गुंजाळ, आप्पासाहेब गुंजाळ, संजय गुंजाळ, भास्कर गुंजाळ, सुनिल रुपवते, तान्हाजी गुंजाळ, विष्णु गुंजाळ, विठ्ठल गुंजाळ, अभिषेक गुंजाळ, सुरेश गुंजाळ, दगडु रुपवते, एकनाथ गुंजाळ, मनोहर गुंजाळ, अमोल गुंजाळ, रोहित गुंजाळ, मयुर गुंजाळ, स्वास्तीक गुंजाळ, भाऊसाहेब गुंजाळ, नारायण गुंजाळ, अर्जुन अरगडे, प्रकाश गुंजाळ, संतोष गुंजाळ, पांडुरंग गुंजाळ, श्रीरंग गुंजाळ, संभाजी गुंजाळ, नानासाहेब पावसे आदि उपस्थित होते.

प्रशासनाकडून वाळू वाहतूक होणारे रस्ते बंद....

खांडगाव ग्रामस्थांनी वाळू उपसाबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशासनाच्यावतीने तलाठी श्रीमती शिंदे यांनी तातडीने प्रवरा नदीपात्रातून वाळू उपसा करुन तिची वाहतूक ज्या रस्त्यावरुन होते ते रस्ते त्वरीत जेसीबीच्या सहाय्याने बंद केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com