संगमनेरात गणरायाची उत्साहात प्रतिष्ठापना

10 गावांमध्ये एक गाव एक गणपती
संगमनेरात गणरायाची उत्साहात प्रतिष्ठापना

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर (Sangamner) शहर व तालुक्यात श्री गणरायाची उत्साहात प्रतिष्ठापना (Enthusiastic installation of Shri Ganarayana) करण्यात आली. संगमनेर शहर (Sangamner City) व परिसरात 45 सार्वजनिक 60 खाजगी मंडळाने नोंद केली. दहा गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ (Ek Gav Ek Ganpati) ही संकल्पना राबवण्यात आली.

गणेश मूर्तीच्या खरेदीसाठी नागरिकांनी सकाळपासूनच शहरात विविध ठिकाणी गर्दी केली होती. शहरातील नवीन नगर रोड, बाजार पेठ, मेन रोड, नाशिक रोड, मालदाड रोड, कुंभार आळा आदी प्रमुख ठिकाणी गणेश मूर्ती व पूजेचे साहित्य घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसत होती. शहरातील मानाच्या सोमेश्वर रंगारगल्ली गणेशोत्सव मित्र मंडळ व इतर मंडळींनी साध्या पद्धतीने गणरायाची प्रतिष्ठापना केली. पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहेे.

संगमनेर शहर व परिसरात 45 सार्वजनिक 60 खाजगी मंडळाने नोंद केली. दहा गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवण्यात आली. तालुक्यातील सुकेवाडी, खांजापूर, कुरण, रायते, खराडी, वेल्हाळे याठिकाणी ही संकल्पना राबवण्यात आली. उशिरापर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना सुरू होती.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांंनी शहरातील शिवाजीनगर येथील सुदर्शन निवासस्थानी सपत्नीक श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधी पद्धतीने केली. दोन वर्षांपासून संपूर्ण जगात करोना संकट आले आहे. ते लवकरात लवकर दूर व्हावे. पुन्हा एकदा सर्वांना खुल्या वातावरणात आनंददायी जीवन जगता यावे. करोनाच्या काळात सर्वांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, गर्दी करू नये. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन मंत्री थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com