संगमनेरचा झालेला परिपूर्ण विकास देशासाठी मॉडेल - शिक्षण मंत्री गायकवाड

ना. बाळासाहेब थोरात हे गोरगरिबांच्या जीवनात विकास घडविणारे भगिरथ- ना. सतेज पाटील
संगमनेरचा झालेला परिपूर्ण विकास देशासाठी मॉडेल - शिक्षण मंत्री गायकवाड

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

राज्यात महाविकास आघाडी सरकार हे अत्यंत चांगले काम करत असून नामदार बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे सक्षमतेने नेतृत्व करताना गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण होईल, यासाठी अविरतपणे काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष राज्यात भक्कम होत असून सततच्या विकास कामातून संगमनेरचा झालेला परिपूर्ण विकास हा देशासाठी मॉडेल ठरला असल्याचे गौरवोद्गार राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी काढले. तर नामदार बाळासाहेब थोरात हे गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे भगीरथ असल्याचे प्रतिपादन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.

संगमनेर नगर परिषदेच्या वतीने प्रभाग क्रमांक 1 ते 14 मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी नगर परिषदेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे होते. तर व्यासपीठावर गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, डॉ. संजय मालपाणी, उपनगराध्यक्ष आरिफ देशमुख, विश्वासराव मुर्तडक, दिलीपराव पुंड, शरयूताई देशमुख, इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्री थोरात, अ‍ॅड. माधवराव कानवडे, लक्ष्मणराव कुटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, कपील पवार, मीराताई शेटे, सुनंदाताई जोर्वेकर, प्रमिलाताई अभंग, सुनंदाताई दिघे, मालतीताई डोके, वृषाली भडांगे, मनीषा भळगट, सुहासिनी गुंजाळ, बेपारी शबाना, कुंदन लहामगे, सोनाली शिंदे, रुपाली औटी, सुमित्रा दिंडी, बाळासाहेब पवार, किशोर पवार, नूर मोहम्मद शेख, नितीन अभंग, गजेंद्र अभंग, राजेंद्र वाकचौरे, किशोर टोकसे, शैलेश कलंत्री, डॉ. दानिश खान, हिरालाल पगडाल, वसीम शेख, कैलास वाकचौरे, नासिमबानो पठाण, रिजवान शेख, अशोक जाजू, योगेश जाजू, मुख्याधिकारी राहुल वाघ, अमर कतारी आदी उपस्थित होते.

ना. गायकवाड म्हणाल्या, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या समाजकारणाची परंपरा ना. बाळासाहेब थोरात यांनी जपली आहे. गोरगरिबांच्या जीवनात सर्वांगीण आनंद निर्माण होण्यासाठी थोरात व तांबे कुटूबियांनी आपले जीवन खर्‍या अर्थाने समर्पित केले आहे. पक्षनिष्ठा, पक्ष नेतृत्वाबद्दल प्रेम, जनतेचे प्रेम याची त्रिसूत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या सुसंस्कृत नेतृत्वाने सदैव जपली आहे. संगमनेर शहर हे विकासाचे मॉडेल ठरले आहेत. स्मार्ट सिटी म्हणणार्‍यांनी खरेतर संगमनेरला येऊन पहावे असे सांगताना जातीय भेद निर्माण करून राजकारण करणार्‍यांना जनतेने ओळखले पाहिजे. आगामी काळात विकासाच्या पाठीमागे सर्वांनी भक्कमपणे उभे राहात ना. बाळासाहेब थोरात यांचे हात बळकट करावे असे आवाहन त्यांनी केले.

गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, संयम असणारे ना. बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व सक्षम व दिशा देणारे आणि विकासाची दृष्टिकोन असलेले नेतृत्व आहे. शाश्वत विकासाचे समाजकारण करताना नामदार बाळासाहेब थोरात यांनी सर्वांना बरोबर घेतले आहे. राज्यात अनेक ऐतिहासिक व दूरदृष्टीचे कामे करताना त्यांनी कधीही कामाचा गवगवा केला नाही मात्र शाश्वत कामे केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचे अनेक मोठमोठी कामे तालुक्यात जिल्ह्यात झाली असून या विभागाचे ते भगीरथ असल्याचे नामदार पाटील यांनी म्हटले आहे

ना. बाळासाहेब थोरात म्हणाले, संगमनेर नगरपालिकेने मागील पाच वर्षात अत्यंत चांगले काम केले आहे. यामध्ये सर्व नगरसेवक नगरसेविका अधिकारी या सर्वांची एकत्रित काम आहे. संगमनेरच्या चारही बाजूने जाणारी रस्ते चौपदरीकरण व सुशोभित होणार असून त्यामुळे पुढील अनेक पिढ्यांच्या भवितव्याचे काम होणार आहे. संस्कृत राजकारणाची परंपरा येथे कायम जपली असून पुढील पिढीने ती जपावी. आज राज्यात तीनच फोटो चालतात त्यामुळे संगमनेरकरांचा गौरव होत असल्याचे ते म्हणाले.

आमदार डॉ. तांबे म्हणाले, नामदार बाळासाहेब थोरात यांच्या सुसंस्कृत नेतृत्वाखाली नगरपालिका अत्यंत चांगले काम केले असून राज्य व राष्ट्रीय पातळीवर मोठमोठे पुरस्कार मिळवले आहेत. नामदार बाळासाहेब थोरात यांनी सत्तेवर येताच निळवंडे कालव्यांच्या कामाला अत्यंत गती दिली असून हे काम पुढील वर्षात पूर्ण होणार आहे. नेतृत्वामुळे येथील कार्यकर्त्यांवर ही विकासाचे व सुसंस्कृत राजकारणाचे संस्कार झाले आहे.

नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या, सर्व नगरसेवक नगरसेविका यांचे मोलाचे सहकार्य संगमनेर शहरातील जनतेची अनमोल साथ यामुळे संगमनेर नगरपालिका राष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळू शकली. यामध्ये जनतेचा वाटा आहे. आज नामदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली मागील पाच वर्षात विकास कामांचा वेग कायम राखताना एअरपोर्ट सारखे बसस्थानक उभे राहिले. प्रत्येकाला गोड पाणी मिळत आहे.

डॉ. संजय मालपाणी म्हणाले, राज्यामध्ये संगमनेर सारखे दुसरे कोणतेही गाव नाही. येथील वैभव शाली इमारती, दररोज मिळणारे स्वच्छ व मुबलक पाणी, अद्यावत स्टॅण्ड याच बरोबर नगरसेवकांनी करोना काळात अत्यंत चांगले काम केले आहे. नामदार बाळासाहेब थोरात यांनी एकोप्याची व सुसंस्कृत राजकारण संगमनेर तालुक्यात निर्माण केले असल्याचे ते म्हणाले.

स्वागत उपनगराध्यक्ष आरीफ देशमुख केले यांनी केले. तर प्रास्ताविक सौ. दुर्गाताई तांबे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर बाळासाहेब पवार यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com