अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिण ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिण ठार

तळेगाव दिघे | वार्ताहर

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील वडझरी बुद्रुक (Vadzari Budruk) शिवारात अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने हरिण (Deer) जागीच ठार झाले. शुक्रवारी (दि. १) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तळेगाव दिघे मार्गे असलेल्या लोणी ते नांदूरशिंगोटे डांबरी रस्त्यावर (Loni - Nandurshingote road) ही घटना घडली.

लोणी ते नांदूरशिंगोटे डांबरी रस्त्या दरम्यान चारा पाण्याच्या शोधार्थ रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने हरिणाला जोराची धडक दिली. हरिणाच्या तोंडाला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिण ठार
Prarthana Behere : पांढऱ्या नक्षीदार साडीतला 'प्रार्थना'चा मोहक लूक, पहा फोटो

युवक कार्यकर्ते शशिकांत जगताप व गणेश बोडखे यांनी याबाबत तळेगाव दिघे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. फड व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर डॉ. फड यांनी घटनास्थळी येवून पाहणी कली.

वनपाल प्रशांत पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचाऱ्यांनी मृत हरिणाला अंत्यसंस्कारासाठी निंबाळे रोपवाटिकेत हलविले. हरिणाच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने वन्य प्राण्यांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागल्याचे अधोरेखित झाले आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिण ठार
Amruta Khanvilkar : 'अप्सरा हो तुम, या कोई परी'! अमृताचं निळ्या साडीतील भुरळ घालणारं सौंदर्य

Related Stories

No stories found.