अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

संगमनेर (शहर प्रतिनिधी)

अज्ञात इसमाने अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना बुधवारी रात्री शहरातील सय्यद बाबा चौकात घडली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शहरातील सय्यद बाबा परिसरातील साडे सतरा वर्षांची मुलगी कुटुंबासह राहत होती. बुधवारी रात्री साडेअकरा ते पहाटे पाचच्या दरम्यान अज्ञात इसमाने तिला फूस लावून पळवून नेले. आपली मुलगी घरात न दिसल्याने तिच्या आईने मुलीचा शोध घेतला. मात्र ती कुठेही आढळून आली नाही.

आपल्या मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले अशी फिर्याद सदर मुलीच्या आईने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमा विरुद्ध भारतीय दंड संहिता ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com