अल्पवयीन मुलीचा विनयभंग; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर (शहर प्रतिनिधी)

अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना तालुक्यातील गुंजाळवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरातील ही मुलगी असून आई-वडिलांचे भांडण झाल्याने ती आपल्या आईसोबत गुंजाळवाडी येथील बाबासाहेब गुंजाळ यांच्या घरी राहत होती.

बाबासाहेब याने दि. ५ ऑक्टोबर रोजी सदर मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. याबाबत तिने आपल्या आईला सांगितले असता तिच्या आईने शांत राहण्यास सांगितले.

यानंतर सदर युवती आपल्या वडिलांकडे आली. काल तिने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी सदर मुलीची आई व बाबासाहेब बाबुराव गुंजाळ ( रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर) यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निकिता महाले हे करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com