
संगमनेर | तालुका प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील निमोण येथे 14 लाख 17 हजार 416 रुपयांचे आरमार्ड केबलचे बंडल सोमवार दिनांक 2 जानेवारी मध्यरात्री चोरुन नेले. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी तिघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, निमोण येथील संदीप भास्कर देशमुख यांच्या घरासमोरून स्कॉर्पिओ वाहनातून अक्षय संजय जाधव (वय 24, बालमटाकळी, ता. शेवगाव) व त्याच्या इतर दोन साथीदारांनी 14 लाख 17 हजार 416 रुपयांचे आरमार्ड केबलचे बंडल चोरुन नेले.
याप्रकरणी संदीप भास्कर देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील तिघांवर पोलिसांनी भादंवि कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय खंडीझोड हे करत आहे.