अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचा मृतदेह नाटकी नाल्यात आढळला

अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचा मृतदेह नाटकी नाल्यात आढळला

संगमनेर (शहर प्रतिनिधी)

अकोले तालुक्यातील नवलेवाडी येथे राहणाऱ्या संकेत सुरेश नवले (वर 22) रा विद्यार्थ्यांचा मृतदेह शहरातील सुकेवाडी रोड परिसरातील नाटकी नाल्यात आढळला. या विद्यार्थ्यांच्या डोक्याला जखमा आढळल्याने हा मृत्यू घात की अपघात याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

नाटकी नाला परिसरात या युवकाचा मृतदेह स्थानिक नागरिकांनी पाहिला. याबाबतची माहिती त्यांनी शहर पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. या विद्यार्थ्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संकेत नवले याच्या एका मित्राने मृतदेह संकेत नवले याचा असल्याने ओळखले.

मयत संकेत हा अकोले तालुक्यातील रहिवासी असून तो इंजिनिअरींगचे शिक्षण घेण्रासाठी संगमनेरला आला होता. कॉलेजच्या समोरच काही मित्रांच्या समवेत एका रूममध्रे तो राहत होता.

त्याचा मृतदेह आढळल्याने पोलिसांनी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मयत संकेत याच्या डोक्यावर हत्याराने वार झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत होते. पोलिसांनी त्याच्या मित्रासोबत चर्चा केल्यानंतर काही महत्त्वाची माहिती पोलिसांना समजली. संकेत हा काल मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेला होता.

त्यानंतर तो रुमवर गेला नाही. त्याचे मोबाईल रेकॉर्ड आणि अन्र काही गोष्टींचा पोलीस तपास करीत आहेत. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 136/2022 नुसार नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com