पहिले लग्न लपवून दुसर्‍या महिलेसोबत केले लग्न

पती व सासर्‍यासह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पहिले लग्न लपवून दुसर्‍या महिलेसोबत केले लग्न

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

पहिले लग्न लपवून दुसर्‍या महिलेसोबत लग्न करून पहिल्या पत्नीला पती व सासर्‍याने त्रास दिल्याने सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील नाईकवाडपुरा येथे ही घटना घडली.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शहरातील नाईकवाडपुरा येथील अतीफ शेख याचे लग्न झालेले होते. पहिले लग्न झालेले असतानाही त्याच्या परिवाराने हे लग्न लपवून अतिफ याचे दुसर्‍या महिलेसोबत लग्न केले. सासरे अमीर शेख यांनी सुनेला शिवीगाळ करून धमकी दिली. तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने नणंदेने काढून घेतले. ही घटना बुधवारी नाईकवाडपुरा येथे घडली.

याबाबत सानिया आतिफ शेख (वय 21) हिनेे शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आतिफ अमीर शेख, अमिर इब्राहीम शेख, मनसुर शेख तिघे रा. नाईकवाडपुरा, संबुरा मोहसीन शेख, तस्लिम फहीम शेख, अतिरा सदाम शेख यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 857/2022 भादंवि कलम 498(अ), 504, 506, 323, 494, 406 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com