संगमनेर कॉटेज रुग्णालयाबाबत ना. विखे यांना निवेदन

संगमनेर कॉटेज रुग्णालयाबाबत ना. विखे यांना निवेदन

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर नगरपरिषदेच्या कॉटेज रुग्णालयामध्ये 100 बेडचे महिला रुग्णालय मंजूर करण्याच्यादृष्टीने आपण निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिले.

संगमनेर नगरपरिषदेच्या कॉटेज रुग्णालयात 100 बेडचे रुग्णालय सुरू होण्याच्यादृष्टीने मागील युती सरकार सत्तेवर असतानाच प्रयत्न सुरू झाले होते. तत्कालिन आरोग्य मंत्री आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच याबाबतीत सकारात्मक विचार करुन, सर्वसमावेशक अहवाल सादर करण्यास सांगितले होते. मात्र त्यानंतर राज्यात आघाडी सरकार आल्यानंतर हा विषय मागे पडला. परंतु आता नव्याने आलेल्या सरकारमध्ये या विषयाचा गांभिर्याने पाठपुरावा करून, कॉटेज रुग्णालय पुन्हा सर्व सुविधांनी कार्यान्वित करण्यासाठी आपला निश्चित प्रयत्न राहील, असे ना. विखे पाटील यांनी भाजपाच्या शिष्टमंडळास सांगितले.

शहर आणि ग्रामीण भागाच्यादृष्टीने कॉटेज रुग्णालय सुरू होणे अत्यंत गरजेचे असून, सर्वसामान्य माणसाला त्याचा दिलासा मिळू शकेल. 100 बेडचे महिलांचेच रुग्णालय सुरु करुन, महिलांनाही आरोग्य सुविधेकरिता याची मदत होईल, असा विश्वास ना. विखे पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. याप्रसंगी भाजप ओबीसी आघाडीचे दीपक भगत, भारत गवळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com