संगमनेरात तरुणाचा मृतदेह आढळला

संगमनेरात तरुणाचा मृतदेह आढळला

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

घुलेवाडी शिवारात एका 20 ते 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह काल सकाळी नाशिक-पुणे महामार्गावरील स्लीपरोडवर आढळून आला आहे. या तरुणाच्या चेहर्‍यावर व छातीवर गंभीर स्वरुपाच्या जखमा असल्याने त्याचा घातपात की अपघात याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

घुलेवाडी शिवारात गट सर्वे नंबर 37 मधील सुनिल धोंडीबा राऊत यांच्या शेताच्या पश्चिमेस नाशिक-पुणे महामार्गावरील स्लीप रोडवर काल सकाळी एका 20 ते 25 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सदर तरुणाच्या अंगात काळेपांढरे चौकटीचा शर्ट, राखाडी रंगाची पॅन्ट, पायात सॅन्डल घातलेला तसेच छातीवर व डोक्यावर गंभीर स्वरुपाच्या जखमा दिसून आल्या. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव यांनी दिलेल्या खबरीवरुन पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 113/2021 सीआरपीसी 134 प्रमाणे नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com