संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळ विजयी

संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या  निवडणुकीत शेतकरी विकास मंडळ विजयी

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास मंडळाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. संचालक मंडळाच्या 13 जागांपैकी 12 जागांवर शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार विजयी झाले.

या निवडणुकीसाठी वसाहतीचे विद्यमान अध्यक्ष भाऊसाहेब एरंडे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाच्या सहा जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित सात जागांसाठी 10 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिल्याने सात जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष भाऊसाहेब रखमा एरंडे, रोहित राजेश चौधरी, मच्छिंद्र शरद जगताप, किसन केशवराव थोरात, सोमनाथ रामनाथ पाबळकर, पियुष ओंकारनाथ भंडारी, नानासाहेब हरिभाऊ वर्पे, अमित रामनाथ सोनवणे, नितीन शिवाजी हासे गोरक्ष भाऊराव सोनवणे या दहा उमेदवारांमध्ये लढत झाली.

विजयी उमेदवार व त्यांना मिळालेले मतदान पुढील प्रमाणे- कारखानदार मतदारसंघ :- कारखानदार सर्वसाधारण प्रतिनिधी भाऊसाहेब रखमा एरंडे (93), किसन केशवराव थोरात (89), सोमनाथ रामनाथ पाबळकर (96)पियुष ओकारनाथ भंडारी (100),अमित रामनाथ सोनवणे (83), नितीन शिवाजी हासे (88), गोरक्ष भाऊराव सोनवणे (79). निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. एस. वाकचौरे यांनी काम पाहिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com