संगमनेरात अचानक प्रकटली शेकडो कुत्रे

संगमनेरात अचानक प्रकटली शेकडो कुत्रे

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर शहर (Sangamner) व परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांची (Dog) संख्या अचानक वाढली आहे. शेजारील तालुक्यातील अज्ञात इसमाने हे मोकाट कुत्रे (Dog) संगमनेरला (Sangamner) सोडले आहे. संबंधित कुत्री (Dog) सोडणार्‍याने या कुत्र्यांपासून आपल्या नागरिकांचा बचाव केला असला तरी या कुत्र्यांमुळे संगमनेरातील नागरिकांना मात्र अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कुत्र्यांनी (Dog) अनेकांना चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नगरपालिका प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष (Ignore) होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

संगमनेर शहर (Sangamner City) व परिसरात अगोदरच मोकाट कुत्र्यांची संख्या भरपूर आहे. नगरपालिका प्रशासनाने (Municipal Administration) यापूर्वी अशा कुत्र्यांना (Dog) पकडून त्यांची रवानगी अन्य ठिकाणी केली होती. असे असले तरी शहरात अद्यापही मोठ्या प्रमाणावर मोकाट कुत्रे फिरताना दिसत आहे. या कुत्र्यांचा (Dog) रात्री-बेरात्री नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या कुत्र्यांमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी आणखी शेकडो कुत्र्यांची भर पडली आहे.

बाहेरील तालुक्यातील ही कुत्री (Dog) असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कुत्र्यांपासून नागरिकाला मोठ्या प्रमाणात त्रास सुरू झाला आहे. हे कुत्रे संगमनेरात (Sangamner) कोणी आणले याबाबत पालिका प्रशासनाने कोणतीही माहिती घेतलेली नाही. संगमनेर (Sangamner) शहरात हे कुत्रे कुणी आणून सोडले याचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

काही महिन्यांपूर्वी संगमनेर नगरपालिकेने (Sangamner Municipality) मोकाट कुत्र्यांची इतर ठिकाणी विल्हेवाट लावल्यानंतर संबंधितांनी आकाड तांडव केला होता. संगमनेर नगरपालिका प्रशासनानेही शहरात फिरणार्‍या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा व शहरात कुत्रे सोडणार्‍यांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.

कुत्री पकडणारा ठेकेदार गायब

संगमनेर शहरातील कुत्री पकडण्यासाठी ठेका लोणी येथील एका इसमास देण्यात आला आहे. संगमनेर नगरपालिकेने त्याला रितसर ठेका दिलेला आहे. शहरातील मोकाट कुत्री पकडून त्यांना जंगलात सोडून देण्याचे काम या ठेकेदाराचे आहे. सुरुवातीस काही दिवस काम केल्यानंतर या ठेकेदाराने कुत्री पकडणे बंद केले आहे. गेल्या सहा महिन्यापासून हा ठेकेदार संगमनेरात फिरकलेला नाही. यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांना कोणीही जबाबदार राहिलेलं नाही. संगमनेर नगरपालिकेचेही या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत नगरपालिकेचे अधिकारी अरविंद गुजर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माहिती दिली. नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही मोकाट कुत्रे शहराबाहेर सोडतो मात्र काही नागरिकांनी कुत्र्यांच्या क्लिप काढून केंद्रीय मंत्र्यांना पाठवल्या होत्या. याचा परिणाम कुत्री पकडण्याच्या मोहिमेवर झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com