संगमनेरमध्ये चारचाकीसह दोन दुचाकी जाळल्या; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेरमध्ये चारचाकीसह दोन दुचाकी जाळल्या; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

शहरातील अभंग मळा येथे अज्ञात व्यक्तीने एका घरासमोर लावलेल्या सफारी चार चाकी व दोन मोटारसायकल जाळून टाकल्याची घटना काल पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभंग मळा येथे राहत असलेले संपत रामचंद्र गलांडे (वय 45) यांच्या मालकीच्या 10 लाख रुपये किंमतीच्या सफारी चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. 17 ए. झेड 6093, वायबीआर दुचाकी एम. एच. 42 एसी 9264 ही 50 हजार रुपये किमतीची तर 60 हजार रुपये किमतीची आर सी 125 केटीएम एम. एच. 17 सीके 3163 ही दुचाकी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून काल पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास जाळून टाकल्या.

याबाबत संपत गलांडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 502/2021 कलम 435 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

Related Stories

No stories found.