संगमनेर आगारातील बसेसच्या 90 टक्के फेर्‍या सुरू

संगमनेर आगारातील बसेसच्या 90 टक्के फेर्‍या सुरू

संगमनेर (वार्ताहर) -

देशभरात करोनाचे सावट संपुष्टात येताना लोकव्यवहार पुन्हा वेगाने सुरू झाले आहेत. माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा सुरू झाल्या असून

वरिष्ठ महाविद्यालय लवकरच सुरू होत आहेत. तथापी अद्याप ग्रामिण भागातील एस.टी वाहतूक पुरेशा प्रमाणात सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती काहीशी घटलेली दिसून येत आहे.तथापी संगमनेर आगाराच्या 90 टक्के फेर्‍या नियमित सुरू झाल्या असून उर्वरित फेर्‍या सुरू होण्याच्यादृष्टीने प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे एस.टी ग्रामीण भागात सुरू झाली की संपूर्ण जनजीवन पुन्हा रूळावरती येण्यास हातभार लागणार आहे.

संगमनेर आगाराच्या करोना पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे बसेस सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यातील 10 बसेस सध्या मुक्कामाच्या ठिकाणी पाठविण्यात येत आहेत.सध्याच्या वेळापत्रकाप्रमाणे सुमारे 80 टक्के कर्मचारी नियमित कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या सुरू असणार्‍या प्रवाशांचे भारमान पन्नास टक्क्याच्या दरम्यान आहे. संगमनेर आगारा अंतर्गत पुण्यासाठी दिवसभरात 186 बसेस, नाशिकसाठी 228 बसेस उपलब्ध आहेत.

सध्या आगाराचे उत्पन्न चार ते साडेचार लाखांच्या आसपास आहे. सध्या महाविद्यालय नियमित सुरू झाल्यानतंर पूर्णक्षमतेने बसेस प्रवाशी भारासाठी चालविण्याचा प्रयत्न असणार आहे. आगारातून प्रवाशांना सुविधा देण्याच्यादृष्टीने आगारप्रमुख निलेश करजकर, स्थानकप्रमुख योगेश दिघे, वाहतूक नियंत्रक जयदीप काशिद, सहायक वाहतूक निरीक्षक भरत मेढे प्रयत्नशील आहेत.

करोनाच्या काळात मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या लोकल रेल्वेसेवा बंद असल्याने राज्यातील अनेक आगाराच्या बसेस मुंबईत प्रवाशी जनतेच्या सेवेसाठी बोलविण्यात आलेल्या आहेत. संगमनेर आगारातील सुमारे पंधरा बसेस मुंबईत असून त्यासोबत वाहक व चालक तसेच आगारातील इतर स्टॉफ असे 50 कर्मचारी देखील मुंबईत कार्यरत आहेत.सध्या प्रत्येक आठवड्याला या आगाराचे कर्मचारी मुंबईत जातात.त्यानंतर पुन्हा आठवडाभरानंतर कर्मचारी बदलला जात असल्याचे सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com