चंदनापुरी घाटात टेम्पो ट्रॅव्हलरला भिषण आग!

दहा जण करत होते प्रवास
चंदनापुरी घाटात टेम्पो ट्रॅव्हलरला भिषण आग!

घारगाव (वार्ताहर)

संगमनेर (Sangamner) तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील (Pune-Nashik National Highway) चंदनापुरी (Chandanapuri) घाटात टेम्पो ट्रॅव्हलरला भिषण आग (Fire) लागल्याची घटना शनिवार ता.२८ मे. रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत डोळासणे महामार्ग पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, टेम्पो ट्रॅव्हलर चालक विजय कोंडीबा काकडे (रा.शिर्डी) हे शिर्डी (Shirdi) येथून दहा जणांना देवदर्शनासाठी भीमाशंकरला (Bhimashankar) घेवून जात होते. शनिवारी सकाळी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात आले असता त्याच दरम्यान टेम्पो ट्रॅव्हलरने पेट घेतला.

चंदनापुरी घाटात टेम्पो ट्रॅव्हलरला भिषण आग!
धक्कादायक! जावयाला टेम्पो खाली चिरडून ठार मारले

त्यामुळे ट्रॅव्हलरमधील सर्वजण घाबरून गेले आणि खाली उतरले. टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागल्याची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे साहय्यक पोलीस निरीक्षक सचिन सुर्यवंशी, नारायण ढोकरे, पंढरीनाथ पुजारी, योगीराज सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर संगमनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबालाही पाचारण करण्यात आले मात्र तोपर्यंत आगीने रौद्र अवतार धारण केला होता. त्यानंतर ही आग विझवण्यात आली तोपर्यंत टेम्पो ट्रॅव्हलर मोठ्याप्रमाणात जळून खाक झाली होती. तर या आगीमुळे वाहणांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही आग कशामुळे लागली होती ते मात्र समजू शकले नाही. दरम्यान पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वाहणांना आग लागण्याचा सिलसिला सुरूच असल्याचे पाहावयास मिळत आहे.

चंदनापुरी घाटात टेम्पो ट्रॅव्हलरला भिषण आग!
लडाखमध्ये जवानांची बस नदीत कोसळली; ७ जवानांचा मृत्यू

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com